Astrology Today 30 April 2024 : आज, मंगळवार, 30 एप्रिल रोजी धनु मकर राशीत जाणार आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी असून या दिवशी साध्य योग, त्रिपुष्कर योग, रवि योग आणि उत्तराषाढ नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे.


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. आज शनिदेवाच्या कृपेने जीवनातील साडेसाती देखील दूर होईल. आजच्या दिवसाच्या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. वृषभ राशीच्या लोकांच्या मनात आज नवीन विचार येऊ शकतात, जे तुम्हाला नवीन मार्ग दाखवू शकतात. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत देखील वाढतील, ज्यामुळे तुमचं उत्पन्न आणि बँक बॅलन्स वाढेल. नोकरदार लोक त्यांच्या कामात गुंतून राहतील, यामुळे तुमच्या करिअरला खूप फायदा होईल आणि तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांचं सहकार्यही मिळेल. व्यापाऱ्यांना आज व्यवसायात चांगला नफा कमावण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, तुमचं भावांसोबतचं नातं अधिक घट्ट होईल आणि सर्व सदस्य एकमेकांना मदत करण्यास तयार होतील.


कर्क रास (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कर्क राशीचे लोक आज प्रत्येक कामाबद्दल अतिशय स्पष्ट असतील आणि त्यांचं ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. आज तुमच्या आयुष्यात काही नवीन बदल घडू शकतात. यशासोबतच तुम्हाला भरपूर पैसेही मिळू शकतात आणि तुम्ही केलेली मेहनत तुम्हाला चांगले परिणाम देईल. नोकरीत असलेल्या लोकांना आज पगारवाढ मिळे शकते. आज तुम्हाला कोर्टाच्या खटल्यातून दिलासा मिळेल आणि मित्रांच्या सहकार्याने अनेक अपूर्ण कामं पूर्ण होतील. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर, पती-पत्नीचं नातं घट्ट होईल आणि ते आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ठोस निर्णय घेऊ शकतील.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. सिंह राशीच्या लोकांवर आज हनुमानाचा आशीर्वाद राहील आणि ते आज पूर्ण उत्साहाने काम करतील, प्रत्येक कामात यशही मिळेल. जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चालवत असाल तर तुम्हाला आज एक नवीन डील मिळू शकेल, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळेल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सापडतील आणि तुम्ही तुमच्या व्यवसायात अधिक उत्साहाने आणि आशेने काम कराल. नोकरदार लोकांना आज एखाद्या कंपनीकडून चांगली पगारवाढीची ऑफर मिळू शकते, ज्यामुळे त्यांचं करिअर जोरात असेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत काही वाद सुरू असतील तर ते सुटतील.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी 30 एप्रिलचा दिवस उत्तम असणार आहे. तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी येत होत्या त्या आज दूर होतील आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून पुढे जाण्यास सक्षम असाल. तुम्हाला पैसे कमवण्याचे नवीन मार्ग सापडतील, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळू शकतो आणि तुम्ही तुमच्या गुंतवणुकीमुळे खूप संतुष्ट असाल. प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस सुंदर असेल, जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर आज तुम्हाला त्यांना भेटण्याची आणि तुमच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळू शकते. वैवाहिक जीवनात सर्व काही चांगलं राहील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखादी मालमत्ता खरेदी करू शकता.


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक राहील. कुंभ राशीच्या राशीच्या लोकांना नशिबाने साथ मिळाल्याने त्यांची संपत्ती वाढेल. तुमची अपूर्ण कामं पूर्ण होतील. आज तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असाल तिथे तुम्हाला तुमची प्रगती दिसून येईल. आज तुमचा सन्मान वाढेल. तुम्ही धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊ शकता. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं तर, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अविस्मरणीय वेळ घालवाल, तुमचं आणि जोडीदाराचं  नातं अधिक गोड होईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Horoscope Today 30 April 2024 : एप्रिल महिन्यातील शेवटचा दिवस तुमच्यासाठी फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं राशीभविष्य