Horoscope Today 30 April 2024 : पंचांगानुसार, आज 30 एप्रिल 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा मंगळवारचा दिवस कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
तुमच्या अंगी असलेल्या कलेची कदर करणारी मंडळी तुम्हाला आज भेटतील. त्यासाठी बरंच काम करावं लागलं तरी नंतर चांगलं फळ मिळेल.
वृषभ (Taurus Horoscope Today)
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला आर्थिक लाभ होईल. शांत आणि प्रेमळ स्वभावाने इतरांची मनं जिंकून घ्याल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
घरामध्ये दुरुस्तीचं काम निघू शकतं, त्यासाठी तुम्हाला जातीने तेथे हजर राहावं लागेल.
कर्क (Cancer Horoscope Today)
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवास करावा लागेल. प्रवासात तब्येत बिघडू नये याची काळजी घ्या.
सिंह (Leo Horoscope Today)
प्रेम प्रकरणांमध्ये अडचणी येतील. पैसा मिळण्यापेक्षा खर्च होण्याचे योग जास्त आहेत.
कन्या (Virgo Horoscope Today)
विद्यार्थी अचानक आपली अभ्यासाची पद्धत बदलण्याची शक्यता आहे. महिला उत्साही बनतील.
तूळ (Libra Horoscope Today)
सर्व गोष्टींचा विचार करून नियोजन केलं तर यश मिळेल. महिलांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल घडतील.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
संततीच्या दृष्टीने दिवस मनासारखा जाईल. आपल्या मनातील सर्व गोष्टींची मुलांबरोबर चर्चा करण्यासाठी उत्तम काळ आहे.
धनु (Sagittarius Horoscope Today)
विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. आत्मविश्वास वाढेल. महिला खर्चिक बनतील परंतु त्यांना पैशाची कमी पडणार नाही.
मकर (Capricorn Horoscope Today)
थोडे जास्त कष्ट केले तर यश आपोआप मागे चालत येईल. नोकरीधंद्यामध्ये भावनेच्या पातळीवर निर्णय घेतले तर नुकसान होईल.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
आज यशाचा मार्ग कष्टातूनच जाणार आहे. नोकरी-व्यवसायाशी संबंधित लोकांशी उत्तम संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा.
मीन (Pisces Horoscope Today)
इतरांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. प्रश्न आपोआप सुटतील. महिलांना आपल्या मनाप्रमाणे वागण्याचा काळ असेल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: