Astrology Panchang 29 October 2024 : आज मंगळवार, 29 ऑक्टोबर रोजी चंद्राचे कन्या राशीत भ्रमण होणार आहे. तसेच आज कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी असून या तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिवाळी सण सुरू होतो.
आज धनत्रयोदशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग, इंद्र योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 3 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
आजचा म्हणजेच धनत्रयोदशीचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूप भाग्याचा असणार आहे. मेष राशीच्या लोकांना आज आपलं काम वेळेवर पूर्ण करायला आवडेल. धनत्रयोदशीच्या निमित्ताने घरातील स्वच्छतेवर भर दिला जाईल आणि विशेष वस्तूंची खरेदीही करता येईल. आज धनत्रयोदशीमुळे व्यापाऱ्यांना चांगला नफा होण्याची शक्यता असून त्यांना प्रतिस्पर्ध्यांकडूनही तगड्या स्पर्धेला सामोरं जावं लागेल. नोकरी करणाऱ्यांना आज ऑफिसमध्ये दिवाळी पार्टीला जावं लागेल आणि अनेक खास लोकांना भेटावं लागेल. भाऊ-बहिणीची नाती दृढ राहतील आणि तुम्ही तुमच्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त करू शकाल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील आणि संध्याकाळी तुम्ही एकत्र धार्मिक स्थळी जाऊ शकता.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा, म्हणजेच धनत्रयोदशीचा दिवस आनंददायी असणार आहे. कन्या राशीचे लोक आज कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील आणि घराच्या सजावटीकडेही लक्ष देतील. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असेल. तुमची वाहन आणि मालमत्ता खरेदीची इच्छा देवी लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होईल. धनत्रयोदशीच्या निमित्ताने घरी पूजेचा कार्यक्रम होईल आणि सर्व सदस्य खूप आनंदी दिसतील. सोने, चांदी, भांडी यांचा व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला आर्थिक लाभ होईल. लक्ष्मी देवीच्या कृपेने व्यापाऱ्यांची चांगली विक्री होईल. नोकरी करणाऱ्यांना आज ऑफिसकडून दिवाळी भेट मिळू शकते.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा म्हणजेच धनत्रयोदशीचा दिवस अतिशय शुभ असणार आहे. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे आज तूळ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आणि कामाच्या ठिकाणी सुरू असलेला तणावही कमी होईल. जर तुम्हाला घर किंवा जमिनीत गुंतवणूक करायची असेल तर या गुंतवणुकीमुळे तुम्हाला भविष्यात चांगला परतावा मिळेल आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीत स्थिरता येईल. जर तुम्ही स्वतः किंवा भागीदारीत व्यवसाय करत असाल तर आज तुमच्या नफ्यात चांगली वाढ होईल. धनत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :