Astrology 23 June 2024 : आज रविवार, 22 जून रोजी चंद्र मकर राशीत भ्रमण करेल.  तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची दुसरी तिथी असून या दिवशी ब्रह्मयोग, त्रिपुष्कर योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पूर्वाषाध नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि रविवारच्या सुट्टीमुळे ते पूर्णपणे रिलॅक्स मूडमध्ये दिसतील. बुद्धिमत्ता, अनुभव आणि क्षमता यांच्या जोरावर ते अगदी मोठ्या समस्याही सहज सोडवतील आणि पुढे जाऊन प्रत्येक काम पूर्ण करतील. तुम्ही तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने वातावरण प्रफुल्लित करण्यात यशस्वी व्हाल. आज धर्मादाय कार्यांवर पैसे खर्च करू शकता. वडील आणि भावांच्या मार्गदर्शनाने तुम्ही कौटुंबिक व्यवसायात यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवनात काही वाद चालू असतील तर ते आज चर्चेने सोडवले जातील आणि संध्याकाळी मुलांसोबत बाहेर जेवायला जाऊ शकता.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. आज सूर्यदेवाच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या व्यवसायात चांगली वाढ होईल. तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. रविवारच्या सुट्टीमुळे ग्राहकांची संख्या अधिक असेल, ज्यामुळे तुमचा व्यवसाय नफ्यात असेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर तुमचं किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचं आरोग्य सतत बिघडत असेल तर आज त्यात सुधारणा होईल. आज तुम्हाला पैसे कमवण्याचे नवीन मार्ग सापडतील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही मालमत्ता देखील खरेदी करता येईल. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, कौटुंबिक वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल आणि तुमचे भावंडांसोबतचे संबंधही चांगले राहतील.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तूळ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल, त्यांना सकाळपासून अनेक शुभवार्ता मिळतील आणि तुमची अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तूळ राशीच्या लोकांना आज एखादा जुना मित्र भेटू शकतो, ज्याच्यासोबत तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. या राशीचे नोकरदार लोक रविवारची सुट्टी एन्जॉय करतील आणि पुढच्या दिवसाचा प्लॅनही करतील. आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल आणि ते इतर व्यवसायात देखील गुंतवणूक करू शकतात. जर तुम्ही जमीन, फ्लॅट किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचं तर, मुलांंचं यश पाहून तुम्हाला आनंद होईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 23 June 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य