Astrology Panchang 16 September 2024 : आज सोमवार, 16 सप्टेंबर रोजी, चंद्र शनीच्या मूळ कुंभ राशीत प्रवेश करेल, जिथे चंद्राचा शनीशी संयोग होईल. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून या दिवशी रवियोग, सुकर्म योग आणि धनिष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. आज मेष राशीच्या लोकांच्या सर्व मनोकामना महादेवाच्या कृपेने पूर्ण होतील आणि तुम्ही ठरवलेली कामं हळूहळू पूर्ण होऊ लागतील. आज तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी व्हाल. तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल तर तो आज परत येऊ शकतो आणि तुमच्या अनेक योजना या पैशाने पूर्ण होतील. आज नोकरी करणाऱ्यांना दुसऱ्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते, ज्यामुळे तुमचा पगार आणि पद देखील वाढेल. आज व्यावसायिकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल.


कर्क रास (Cancer)


आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. कर्क राशीचे लोकांना आज मानसिक शांती मिळेल. तुम्ही तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकाल. तुम्हाला कोणत्याही बँकेकडून किंवा व्यक्तीकडून कर्ज घ्यायचं असेल तर ते आज सहज उपलब्ध होईल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मित्राच्या मदतीचा फायदा होईल आणि त्यांच्या करिअरला सुरुवात होईल. त्याच वेळी, आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ते नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकतील. कुटुंबात हशा आणि आनंदाचं वातावरण असेल, ज्यामुळे दिवसभराचा थकवा दूर होईल.


कन्या रास (Virgo)


आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. आज महादेवाच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांना अनेक लाभ मिळतील आणि आपल्या हुशारीच्या बळावर ते इतरांकडून सहजपणे कामं करून घेऊ शकतील. जर तुम्ही खूप दिवसांपासून परदेशात जाण्याचं स्वप्न पाहत असाल तर ती इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीत असलेल्यांना आज सहकाऱ्यांशी चांगल्या संबंधांचा फायदा होईल. त्याच वेळी, व्यावसायिकांना आज नवीन व्यवसाय ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे चांगला नफा मिळेल. जे प्रेम जीवनात आहेत ते आज त्यांच्या नात्याचा पुरेपूर आनंद घेतील.


मकर रास (Capricorn)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. मकर राशीच्या लोकांना आज महादेवाच्या कृपेने त्यांच्या जीवनात सुरू असलेल्या तणावापासून आराम मिळेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर आज तुमचंं आरोग्य चांगलं राहील. कर्मचारी आज पगारवाढीबाबत अधिकाऱ्यांशी बोलू शकतात आणि इतर ठिकाणी नोकरी देखील शोधू शकतात. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल आणि भागीदारांशी संबंध सुधारतील. कुटुंबातील सदस्याच्या लग्नासाठी वाटाघाटी कुटुंबातील सर्व सदस्यांच्या संमतीने पुढे जाऊ शकतात. 


मीन रास (Pisces)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. मीन राशीच्या लोकांनी आज कोणतंही काम करायचं ठरवले तरी ते पूर्ण करूनच मानतील. दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वत:च्या बळावर काम केल्यास आज यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला कोणत्याही कामात जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील. आज तुम्ही तुमच्या कार्याने समाजात एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल आणि तुमच्या कुटुंबाचं नावही उंचावेल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 16 September 2024 : आज सोमवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य