Astrology Panchang 15 December 2024 : आज रविवार, 15 डिसेंबर रोजी चंद्र वृषभ राशीनंतर मिथुन राशीत जाणार आहे आणि चंद्र मिथुन राशीत गेल्यावर मंगळ दुसऱ्या भावात असल्यामुळे सुनफा योग तयार होत आहे. तसेच आज मार्गशीर्ष मासातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा असून या तिथीला मार्गशीर्ष पौर्णिमेचं व्रत पाळण्यात येणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सुनफा योग आणि मृगाशिरा नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 3 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. मिथुन राशीचे लोक आज चांगलं जीवन जगतील आणि नवीन गोष्टी शिकण्यात नेहमी पुढे राहतील. रविवारच्या सुट्टीमुळे तुम्ही दिवसभर रिलॅक्स मूडमध्ये असाल आणि जुन्या मित्रांनाही भेटाल. तुमच्या जोडीदारासोबत जवळीक वाढेल आणि तुम्हाला त्यांच्याकडून काही उपयुक्त सल्लेही मिळू शकतात, ज्यामुळे तुमच्यामध्ये एकमेकांप्रती प्रेमाची भावना जागृत होईल. व्यावसायिकांना सरकारी क्षेत्रातून विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज कुटुंबात एखाद्या सदस्याचं लग्न ठरवण्यासाठी नातेवाईकांची ये-जा होणार आहे.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. आज सूर्यदेवाच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होतील आणि सूर्याच्या तेजाप्रमाणे समाजात तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल. लव्ह लाईफमध्ये आज दोघांच्या नात्यात गोडवा वाढेल आणि परस्पर विश्वासही दृढ होईल. त्याच वेळी, आज अविवाहित लोकांच्या आयुष्यात कोणीतरी खास येण्याची शक्यता आहे. आज रविवारच्या सुट्टीचा व्यापाऱ्यांना चांगला फायदा होईल, दिवसभर ते व्यावसायिक कामात व्यस्त राहतील आणि विक्रीही वाढेल. आज तुम्ही झटपट निर्णय घेऊ शकाल आणि प्रत्येक काम सहजतेने पूर्ण करू शकाल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. धनु राशीच्या लोकांना त्यांच्या भावांच्या मदतीने त्यांचे अडकलेले पैसे आज परत मिळतील आणि चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी देखील मिळेल, ज्यामुळे भविष्यात चांगला नफा मिळेल. विवाहित लोक त्यांच्या सासरशी चांगले संबंध निर्माण करण्यात यशस्वी होतील, ज्यामुळे त्यांच्या नात्यात गोडवा वाढेल आणि ते नेहमी मदतीसाठी तयार राहतील. आज तुम्ही सुरू केलेल्या नवीन व्यवसायात नफ्याच्या चांगल्या संधी मिळतील. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी असेल. संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत घालवायला आवडेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: