Astrology Panchang 14 December 2024 : आज शनिवार, 14 डिसेंबर रोजी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, जिथे बृहस्पतिच्या अस्तित्वामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. तसेच आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी असून याच तिथीला दत्तात्रेय जयंतीही साजरी केली जाते. दत्तात्रेय जयंतीला अमृत सिद्धी योग आणि रोहिणी नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. आज शनिदेवाच्या कृपेने तुम्ही असे निर्णय घ्याल जे तुम्हाला जीवनात पुढे नेतील. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात मित्र आणि सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल आणि ते एकत्र चांगले अभ्यास करतील. आज व्यवसाय करणारे चांगला नफा कमावण्यात यशस्वी होतील आणि मजबूत प्रतिस्पर्धी म्हणून उदयास येतील. आज तुम्हाला इतरांना मदत करून चांगलं वाटेल. तसेच, मातृपक्षाकडून काही चांगली बातमी ऐकू येईल. एखाद्या धार्मिक स्थळी संध्याकाळ घालवणं चांगलं राहील.
सिंह रास (Leo Horoscope Today)
आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना आज प्रत्येक पावलावर नशिबाची साथ मिळेल. आज लोक तुमचं म्हणणं स्वीकारतील. आज तुमचं उत्पन्न आणि ऐषोराम वाढण्याची शक्यता आहे आणि तुमची बँक बॅलन्सही वाढेल. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस अनुकूल असेल, शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला चांगला नफाही मिळेल. आज तुम्ही मित्रांसोबत बराच वेळ घालवाल आणि काही नवीन मित्र बनण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचं सोशल सर्कल वाढेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगलं राहील.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. तूळ राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला घर, जमीन आणि वाहन घ्यायचं असेल तर आज शनिदेवाच्या कृपेने तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज पैसे कमावण्याचे नवीन मार्ग मोकळे होतील आणि तुमच्या निम्म्याहून अधिक चिंता नाहीशा होतील. आज व्यावसायिक लोकांचं सर्व लक्ष कामावर असेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि तुमच्या मुलांची प्रगती पाहून तुम्हालाही आनंद वाटेल. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आज सकाळपासून उत्साही वाटेल, ज्यामुळे तुम्ही सर्व कामं करण्यात यशस्वी व्हाल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल. तुमची गरज असेल तेव्हा तुमचे कुटुंब तुमच्यासोबत उभे दिसेल आणि तुम्ही काही नवीन मित्रही बनवाल. नोकरदारांना आज कामाच्या ठिकाणी मोठं यश मिळेल. जर तुम्ही वाहन, घर, फ्लॅट इत्यादी खरेदी करण्यासाठी बँकेच्या कर्जासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला ते आज मिळू शकेल. भावा-बहिणींमध्ये वैचारिक मतभेद सुरू असतील तर ते आज संपतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांनी आज कोणतंही काम हाती घेतलं तरी शनिदेवाच्या कृपेने ते निश्चितच यशस्वी होतील आणि वडिलांच्या मदतीने प्रत्येक समस्येवर उपाय शोधू शकतील. जर तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली असेल तर ती आज चांगला नफा देऊ शकते. व्यवसायात काही नवीन संधी तुमच्या वाट्याला येतील, तुम्हाला त्या ओळखाव्या लागतील, तरच ते तुम्हाला शुभ परिणाम देऊ शकतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत कठोर परिश्रम करावे लागतील, तरच त्यांना यश संपादन करता येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Horoscope Today 14 December 2024 : आज शनिवारचा दिवस 'या' 3 राशींसाठी असणार खास; वाचा आजचे राशीभविष्य