Astrology Panchang 10 January 2025 : आज शुक्रवार, 10 जानेवारी रोजी वृषभ राशीत चंद्र आणि गुरुची युती होऊन गजकेसरी योग तयार होईल. याशिवाय आज पौष मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी असून या दिवशी शुभ योगासह शुक्ल योगही तयार होत आहे. तसेच कृतिका नंतर रोहिणी नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांना आज शिक्षण आणि व्यवस्थापन क्षेत्रात चांगलं यश मिळेल. कोचिंग क्लास किंवा कोणतीही शैक्षणिक संस्था चालवणाऱ्यांना लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाचा विशेष लाभ होईल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. परदेशातूनही लाभ मिळतील. तुमच्या नोकरीत अधिकारी तुम्हाला काही महत्त्वाचं काम सोपवू शकतात, जे तुम्ही यशस्वीपणे पूर्ण कराल आणि तुमच्या बॉसच्या नजरेत स्टार बनाल. राजकीय क्षेत्रातूनही आज तुम्हाला फायदा होईल.
कन्या (Virgo Horoscope Today)
आज कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचा तसेच नशिबाचा फायदा मिळेल. कन्या राशीच्या लोकांना व्यवसायात लाभाची शक्यता प्रबळ असेल. तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकेल असा एखादा करार तुम्हाला मिळेल. कन्या राशीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुमच्या मुलांमुळे तुमचं मन प्रसन्न राहील. तुम्हाला काही भेटवस्तू आणि सन्मान मिळू शकतो. घरातील वडीलधाऱ्यांकडूनही एखादी गोष्ट मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप भाग्याचा असणार आहे. खूप दिवसांपासून प्रलंबित असलेलं महत्त्वाचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, त्यात तुम्हाला यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी योग्य समन्वय राखाल आणि तुम्हाला त्यांची मदतही होईल. तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होईल. भागीदारीच्या कामातही तुम्हाला तुमच्या भागीदारांकडून सहकार्य आणि लाभ मिळेल. तुम्हाला कुठूनतरी अचानक आर्थिक लाभही मिळू शकतो.
धनु (Sagittarius Horoscope Today)
आजचा शुक्रवार धनु राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी देवीच्या कृपेने लाभदायक राहील. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. जे लोक मॅनेजमेंटचं काम करत आहेत, त्यांचा कामाच्या ठिकाणी प्रभाव वाढेल. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते. नोकरीत अधिकारी तुमच्या कामावर खूश असतील आणि तुम्हाला बढतीची संधी मिळेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. मित्रांच्या मदतीने तुम्हाला लाभही मिळतील.
मकर (Capricorn Horoscope Today)
गुरु आणि चंद्राच्या संयोगामुळे मकर राशीसाठी आजचा दिवस लाभदायक राहील. तुमच्या वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला आनंद आणि लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही नवीन काम सुरू करू शकता. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडूनही लाभ मिळू शकतो. मकर राशीच्या लोकांना शैक्षणिक परीक्षांत यश मिळेल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचं आर्थिक नियोजन यशस्वी होईल. पूर्वी केलेली गुंतवणूक तुम्हाला नफा मिळवून देऊ शकते. कामाच्या संदर्भात केलेला प्रवास यशस्वी होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: