Astrology Panchang 08 September 2024 : आज रविवार, 8 सप्टेंबरला चंद्र तूळ राशीत जात असून सिंह राशीत सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होत आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवी तिथी असून या दिवशी बुधादित्य योगासोबत आंद्र योग, रवि योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. वृषभ राशीचे लोक आज संपूर्ण दिवस मस्तीच्या मूडमध्ये असतील आणि काही नातेवाईकांना भेटण्याची संधीही मिळेल. तुमच्या मेहनतीचं फळ चाखण्यासाठी आणि ऐषोआरामाने जीवन जगण्यासाठी आजचा दिवस उत्तम असेल. व्यवसायात वाढ झाल्यामुळे मनामध्ये आनंदाची भावना राहील. तुम्ही संध्याकाळ मित्रांसोबत हँग आउटमध्ये घालवाल.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी असणार आहे. आज पैशांची बचत करण्यासोबतच, तुम्ही काही दीर्घकालीन गुंतवणुकीचीही योजना कराल, ज्यामुळे तुम्ही भविष्यात चांगला नफा मिळवू शकाल. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून काही चांगली बातमी ऐकू येईल, ज्यामुळे कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. व्यापारी लोकांची व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. कर्मचारी आज रिलॅक्स मूडमध्ये असतील आणि रविवारच्या सुट्टीचा पूर्ण आनंद घेतील. 


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली घरगुती कामं पूर्ण करण्याची संधी आज मिळेल. रविवारच्या सुट्टीमुळे मुलांमुळे घरात गोंगाटाचं वातावरण राहील आणि जुन्या मित्रांना भेटण्याची संधीही मिळेल. नशीब तुमच्या बाजूने असल्याने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दिवसभर व्यस्त राहतील आणि त्यांना चांगला नफाही मिळेल. 


मकर रास (Capricorn)


आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. आज तुमचा बँक बॅलन्सही वाढेल. रविवारच्या सुट्टीमुळे व्यवसायात पैसे कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. या राशीचे लोक ज्यांना परदेशात फिरायला जायचं आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या आईसोबत काही धार्मिक कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळेल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये एकता दिसून येईल. संध्याकाळी तुमच्या जोडीदारासोबत देवाच्या दर्शनाचा लाभ घ्याल.


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कुंभ राशीचे लोक आज खर्चाचे नियोजन करून पुढे जातील आणि पैशाची बचतही करू शकतील. प्रलंबित कामं पूर्ण करावी लागतील. कुटुंबातील सदस्याकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. काही गैरसमजामुळे कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहील, परंतु कुटुंबातील मोठ्यांच्या पाठिंब्याने काही काळानंतर ते सामान्य होईल. संध्याकाळी एखाद्या विद्वान व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 08 September 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य