Astrology Panchang 02 December 2024 : आज सोमवार, 2 डिसेंबर रोजी चंद्र वृश्चिक राशीनंतर धनु राशीत जाणार आहे. तसेच आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी असून या दिवशी शुभ योग, शूल योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. वृषभ राशीचे लोक आज धार्मिक कार्यात गुंतलेले दिसतील. जर तुमचा सासरच्या लोकांशी काही वाद चालू असेल तर आज तुमच्या नात्यात सुधारणा दिसेल आणि तुमचे सर्वांशी संबंध सुधारतील. व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा होण्याची शक्यता आहे आणि ते इतर व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचारही करतील. नोकरी करणाऱ्यांचे आज अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील, त्यामुळे तुम्ही कामात चांगली कामगिरी कराल. तुम्ही तुमच्या भावंडांसोबत सहलीला जाण्याचा विचार कराल.
सिंह रास (Gemini Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना आज महादेवाच्या कृपेने दीर्घ त्रासानंतर आराम मिळेल आणि गोष्टी तुमच्या इच्छेनुसार होतील. तुम्ही तुमच्या कामातून तुमच्या कुटुंबाला वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न कराल आणि प्रत्येकाच्या गरजा पूर्ण कराल. आज तुमचं सोशल सर्कल वाढेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी चांगलं असेल आणि भविष्यात चांगला नफा देखील देईल. जर तुम्हाला जमीन किंवा इतर कशातही गुंतवणूक करायची असेल तर महादेवाच्या कृपेने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते. कुटुंबातील सर्वांशी तुमचे चांगले संबंध असतील आणि ते तुमचे म्हणणं गांभीर्याने घेतील.
तूळ रास (Gemini Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. आज प्रत्येक पावलावर नशीब तुमच्या सोबत असेल आणि ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला काळजी होती त्या चिंताही दूर होतील. तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक विशेष संधी मिळतील, यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि महादेवाच्या कृपेने तुमचा बँक बॅलन्सही वाढेल. तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असेल. आज तुम्हाला तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी एखाद्या विशेष व्यक्तीकडून सल्ला मिळेल, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफाही मिळेल. तुमच्या मुलांची प्रगती पाहून तुमचं मन प्रसन्न होईल आणि समाजात तुमचा सन्मानही वाढेल.
धनु रास (Gemini Horoscope Today)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. आज महादेवाच्या कृपेने धनु राशीचे लोक दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण करू शकतील आणि त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी काही वस्तूंची खरेदीही करतील. कुटुंबात काही शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. आज सासरच्यांकडून आर्थिक लाभ होताना दिसतो आणि ते नेहमी तुमच्या मदतीसाठी तत्पर राहतील. नोकरदारांना कामावर सकारात्मकतेचा अनुभव येईल. व्यवसाय करणाऱ्यांचा आज व्यवसाय विस्तारेल आणि तुम्हाला भरपूर पैसेही मिळतील. जर लव्ह लाईफमध्ये असलेल्यांना त्यांच्या नात्याचं रूपांतर लग्नात करायचं असेल तर ते त्या दिशेने पावलं उचलू शकतात.
मीन रास (Gemini Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर पालक, शिक्षक आणि मार्गदर्शकांचं सहकार्य लाभेल. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल आणि तुमच्या जोडीदारासोबत काही नातेवाईकांना भेटण्याची संधीही मिळेल. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल, त्यांची त्यांच्या आवडीच्या ठिकाणी बदली होऊ शकते. कामावर तुमची प्रगती पाहून काही नवीन शत्रूही निर्माण होऊ शकतात, परंतु केवळ धैर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही या लोकांना पराभूत करू शकाल. भावाच्या किंवा बहिणीच्या लग्नात कुटुंबात काही अडथळे असतील तर ते आज नातेवाईकाच्या मदतीने दूर होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: