Never Put Your Feet on These 6 Things : सनातन धर्मात पाप आणि पुण्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सनातन धर्मात काही गोष्टींना फार महत्त्व आहे, या गोष्टींना लक्ष्मीप्रमाणे समजलं जातं आणि म्हणूनच त्यांना पाय लागणं हे चुकीचं मानलं जातं. 


घरातील काही गोष्टी या लक्ष्मीसमान पाहिल्या जातात आणि त्यांना पाय लागल्याने व्यक्ती पापात सहभागी होतो, असं समजलं जातं. अशा नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यांना सनातन धर्मात (Religion) विशेष महत्त्व आहे, जाणून घेऊया.


1. शंख


ज्योतिषशास्त्राच्या मते, कणाकणात देव वास करतात. आपण पृथ्वीवर चालतो, तिला देखील आपण मातेचा दर्जा दिला आहे. शंखाला पूजेदरम्यान विशेष महत्त्व आहे. शंखाला कधीही पायाने स्पर्श करू नये, कारण त्यात लक्ष्मीचा वास असतो. शंखाला पाय लावल्याने धनहानी होऊ शकते.


2. गाय


हिंदू धर्मात गाईला मातेचं रुप मानण्यात आलं आहे. तसेच गाईचं पूजनही केलं जातं, त्यामुळे गाईला पाय लावू नये. काही जण गाईला पळवून लावण्यासाठी पाय मारतात, त्यामुळे ते पापाचे धनी ठरतात. गायीला पाय मारल्याने बुद्धीचा नाश होतो.


3. झाडू


झाडूला कधीही पायाने स्पर्श करू नये. झाडू दारिद्र्य दूर करते, त्यात देवी लक्ष्मीचा वास असतो. झाडूला पाय लावणं म्हणजे अपमान करण्यासारखं आहे. झाडूला चुकून पाय लागलाच तर पाया पडून माफी मागावी.


4. पितळेची भांडी


पितळेची भांडी सूर्याचे प्रतिनिधित्व करतात, म्हणून या भांड्यांवर कधीही पाऊल ठेवू नये. असं केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्र कमजोर होऊ शकतो.


5. तुळशीची पानं


सनातन धर्मात तुळशीच्या पानांचं विशेष महत्त्व असून ते पूजनीय आहे. तुळशीच्या पानांवर कधीही पाय पडू नये. तुळशीची पानं ही गुणकारी तर आहेतच, पण त्यांचा धार्मिक महत्त्व देखील आहे, त्यामुळे त्यांचा कधी अपमान होऊ नये.


6. खाद्यपदार्थ


खाण्यापिण्याच्या गोष्टींना कधीही पाय लावू नये. खाण्याच्या पदार्थांवर पाय पडल्यास त्वरित पाया पडावं, खाण्यापिण्याच्या गोष्टींशिवाय पूजा किंवा हवनाच्या साहित्यालाही कधी पायाने स्पर्श करू नये. हे धार्मिक दृष्टीने चुकीचं मानलं जातं आणि असं केल्याने व्यक्तीचं सर्वांगीण नुकसान होऊ लागतं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Ayodhya Ram Mandir : शरीरालाच मंदिर बनवतात 'या' सांप्रदायाचे लोक; अंगभर गोंदून घेतात 'राम' नाम