Saif Ali Khan Admitted : बॉलिवूड अभिनेता सैफ अली (Saif Ali Khan) खानाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आज सकाळपासून सैफला मुंबईतील रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. अभिनेत्री करिना कपूरही त्याच्यासोबत आहे. दरम्यान सैफबाबतच्या या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. सैफ अली खानला नेमकं झालंय तरी काय? हे जाणून घेण्यासाठी चाहते उक्सुक आहेत. 


सैफ अली खानला नेमकं काय झालंय? (Saif Ali Khan)


रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सैफ अली खानचा गुडघा आणि खांदा फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे आज त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सैफच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. यावेळी करिनाही उपस्थित होती. सर्जरी करण्यासाठी अचानक गरज पडली नव्हती. आपल्या दुखापतीबाबत सैफला यापूर्वीच माहिती होती. अनेक महिन्यांपासून ही शस्त्रक्रिया करायची होती. जी सैफने आज केली आहे. शस्त्रक्रिया जास्त गंभीर नव्हती. सैफ सध्या पूर्णपणे बरा आहे. चिंतेची कोणतीही गोष्ट नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. 


यापूर्वीही सैफवर पार पडली होती शस्त्रक्रिया (Saif Ali Khan)


सैफ अली खानवर दुखापत झाल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तो शूटींगच्या सेटवर अनेकदा जखली झालेला पाहायला मिळालेला आहे. साल 2016 ला रंगून या सिनेमाच्या शूटींगदरम्यान, सैफ अली खानच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, ही शस्त्रक्रियाही गंभीर स्वरुपाची नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. 


बॉलिवूडमध्ये सैफचा धमाका सुरुच  (Saif Ali Khan)


सैफ अली खानने वयाची 50 पार केली तरी सिनेमाच्या बाबतीत तो कोठेच मागे नाही. 2023 आदिपुरुष हा त्याने शेवटचा सिनेमा केला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करण्यात सिनेमाला अपयश आले होते. सैफच्या या भूमिकेबाबत त्याला तुफान ट्रोल करण्यात आले होते. मात्र, सैफ नव्या वर्षात पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झालाय. सैफ या वर्षात तेलगूच्या थ्रिलर सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देवरा असे या सिनेमाचे नाव आहे. सध्या सैफ अली खान या सिनेमामुळे चर्चेत आहे. याशिवाय गो गोवा गॉन या चित्रपटातही दिसणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ram Temple: रितेश म्हणतो, "500 वर्षांची प्रतीक्षा संपली" तर श्रेयस म्हणतो, "आपल्या हयातीत आपल्याला हा क्षण अनुभवता आला"