Astrology : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, पुढच्या 15 दिवसांत असे काही ग्रह संक्रमण करणार आहेत जे 5 राशींच्या (Zodiac Signs) लोकांसाठी फार आव्हानात्मक ठरणार आहे. या राशींना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जून महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात मंगळ केतू ग्रह मिळून कुजकेतू योग जुळून येणार आहे. याशिवाय बुध आणि सूर्य ग्रहसुद्धा संक्रमण करणार आहेत. याचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, 5 राशींना नकारात्मक परिणामाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे जून महिन्यात पुढचे 15 दिवस कोणत्या राशींसाठी अशुभ असतील ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची गरज आहे. अन्यथा तुम्हाला एका दुर्घटनेचा सामना करावा लागू शकतो. तुमचा जुना आजार तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतो. या काळात तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. मात्र, खर्चदेखील तितकाच वाढेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

जूनचा महिना वृषभ राशीसाठी फारसा खास नसणार आहे. या काळात तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला भेडसावू शकतात. मात्र, 29 जूनपासून तुमची परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांना या काळात मानसिक तणाव जाणवू शकतो. छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्ही ताण घ्याल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक समस्या भेडसावतील. तुमचे खर्च वाढतील. तसेच, नातेसंबंधात वाद निर्माण होतील. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुमच्या नोकरी-व्यवसायात तुम्हाला नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, एकामागोमाग एक आव्हानं तुमच्यावर येऊ शकतात. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी जून महिना फार संकटाचा असणार आहे. या काळात तुमचं कामात मन रमणार नाही. तसेच, तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यावर पुन्हा विचार करण्याची गरज भासेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :                          

Guru Asta 2025 : अवघ्या 2 दिवसांत गुरु ग्रहाचा होतोय अस्त; 'या' 3 राशींचे सुरु होतील अच्छे दिन, नोकरी-व्यवसायाला लागणार यू टर्न