Guru Asta 2025 : वैदिक पंचांगानुसार, 10 जून 2025 रोजी गुरु ग्रह (Guru Asta) मिथुन राशीत अस्त होणार आहे. गुरु ग्रह पुढचे 27 दिवस याच स्थितीत असणार आहे. गुरु ग्रह 10 जून रोजी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी अस्त होणार आहे. तर, 9 जुलै रोजी पुन्हा उदित होणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा एखाद्या ग्रहाचा अस्त होतो तेव्हा त्याची प्रभावशीलता कमी होते. मात्र, हा काळ काही राशींच्या लोकांसाठी फार महत्त्वाचा असतो. सध्या गुरु ग्रहाच्या अस्तामुळे काही राशींना विशेष लाभ मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
गुरु ग्रहाच्या अस्ताने मेष राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. या राशीच्या तिसऱ्या चरणात गुरु अस्त होणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. भावा-बहिणींचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, करिअरमध्ये तुम्ही नवी उंची गाठाल. सकारात्मक विचार आत्मसात कराल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचं अस्त होणं मानसिक आणि शारीरिकरित्या फार लाभदायक ठरणार आहे. तुमच्या तब्येतीत हळुहळू सुधारणा होताना दिसेल. तुमच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी दूर होतील. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. धनलाभ होईल. करिअर-बिझनेसमध्ये चांगलं यश मिळेल. मित्र परिवाराचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
गुरु ग्रहाचं अस्त होणं कुंभ राशीच्या लोकांसाठी फार लकी ठरणार आहे. तुमच्या आत्मविश्वासाच्या आधारावर तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमची निर्णयक्षमता चांगली असेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, मनासारखं काम करता येईल. कोर्ट कचेरीच्या संदर्भातील तुमची सगळी कामे पूर्ण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :