Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार, घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करतो. यामध्ये वेळीच जादूटोणा, अंधश्रद्धा सारख्या अशुभ गोष्टींवरही नकळतपणे विश्वास ठेवला जातो. त्याचप्रमाणे, रस्त्यावरुन चालताना अनेकदा आपल्या रस्त्यावर काही किंमती वस्तू पडलेल्या दिसतात. अनेकदा लोक या वस्तू पटकन उचलून आपल्या खिशात घालतात. पण, रस्त्यावर पडलेल्या अशा काही वस्तू आहेत ज्यांना आपण चुकूनही हात लावता कामा नये. 

कुंकू 

कुंकूचा रंग लाल असतो. विवाहित स्त्रिया या लाल रंगाच्या कुंकूचा जास्त वापर करतात. मात्र, कुंकू प्रमाणेच इतर गोष्टींचा देखील वापर जादूटोणासाठी केला जातो. त्यामुळे जर तुम्हाला रस्त्यात कुंकू पडलेला दिसला असेल तर त्यापासून दूरच राहा. चुकूनही हात लावण्याची चूक करु नका. 

भाजलेला नारळ 

अनेकदा पूजा-पाठ करताना किंवा एखाद्या शुभ प्रसंगी नारळाचा वापर केला जातो. जर तुम्हाला रस्त्यात भाजलेला नारळ दिसला तर तो कधीच उचलू नका. याचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. 

केसांचा गुंता

केसांचा वापर जादूटोणासारख्या अशुभ कामांसाठी देखील केला जातो. त्यामुळे जर तुम्हाला रस्त्यावर असा केसांचा गुंता दिसला तर तो उचलू नका. 

लवंग आणि पान 

लवंग आणि पानांचा वापर पूजेच्या वेळी देखील केला जातो. तसेच, पानं देवाला चढवली जातात. मात्र, या वस्तूंचा वापर जादूटोण्यातही केला जातो. त्यामुळे जर रस्त्यावर या वस्तू पडलेल्या असतील तर त्या उचलू नका. 

मेणबत्ती 

अनेकदा समुद्रकिनारी किंवा रस्त्यावर चालताना आपल्याला जळलेल्या मेणबत्त्या दिसतात. या कधीच उचलण्याची चूक करु नका. कारण मेणबत्तीचा वापर जादूटोण्याबरोबरच पूजेच्या वेळी देखील केला जातो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : आपल्या घरातील आजोबांप्रमाणेच असतो शनी, शनीची साडेसाती म्हणजे एक सुवर्णसंधीच; राशीचक्रकार शरद उपाध्ये सांगतात...