Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखाद्या उग्र आणि कडक ग्रहाची दृष्टी राशींवर पडते, तेव्हा त्या राशींच्या व्यक्ती आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही. अशा व्यक्ती सतत चुकीची कामे करू लागतात. याचे गंभीर परिणाम त्या व्यक्तीला भोगावे लागतात. ग्रहांच्या भ्रमणाच्या काही राशींवर मोठा परिणाम होतो. अशा राशीच्या लोकांना नेहमी शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. या राशीच्या लोकांनी नेहमी आपल्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. चाल तर, जाणून घेऊया कोणत्या राशी या यादीत सामील आहेत...
मेष (Aries) : मेष राशीच्या लोकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. अर्थात या राशीवर मंगल ग्रहाचा मोठा प्रभाव आहे. मंगळ ग्रह हा धैर्य, युद्ध, संहारक, क्रोध इत्यादींचाही कारक आहे. जेव्हा, मेष राशीच्या कुंडलीत मंगळ ग्रहाची वक्र दृष्टी असते, तेव्हा व्यक्ती आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही. अशा वेळी या व्यक्ती रागापायी स्वतःचे मोठे नुकसान करतात.
सिंह (Leo) : सिंह राशीचे लोक निडर आणि बेधडक असतात. सूर्य या राशीचा स्वामी आहे. जेव्हा तो शुभ असतो, तेव्हा या राशीच्या व्यक्ती उच्च पदावर पोहोचतात आणि यश मिळवतात. ते नेहमी सर्वांना सोबत घेऊन पुढे जातात. अशी लोक आजबाजूच्या लोकांमध्ये खूप प्रसिद्ध असतात. लोक त्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवतात. परंतु, जेव्हा या राशीवर राहू किंवा केतू या अशुभ ग्रहांची वक्र दृष्टी पडते, तेव्हा त्यांना नैराश्य येते आणि रागाच्या भारत ते नुकसान ओढवून घेतात.
वृश्चिक (Scorpio) : वृश्चिक राशीचा स्वामीही मंगळ आहे. जेव्हा मंगळ शुभ असतो, तेव्हा तो खूप शुभ गोष्टी घडतात. पण जेव्हा, या राशीवर राहूची दृष्टी पडते, तेव्हा या राशीच्या लोकांना अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात. अशावेळी या राशीचे लोक रागाच्या भरात चुकीच्या कामात अडकून व्यक्तीचे मोठे नुकसान होते. राहू आणि मंगळाच्या संयोगाने अंगारक योग तयार होतो. या स्थितीत वाद झाल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता असते.
मकर (Capricorn) : मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनी हा अतिशय कठोर ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रहांमध्ये शनीला थेट न्यायाधीशाची पदवी मिळाली आहे. जेव्हा शनि चंद्र किंवा इतर अशुभ ग्रहांच्या संपर्कात येतो, तेव्हा त्याच्या क्रोधामुळे व्यक्तीचे मोठे नुकसान होऊ शकते. अशा व्यक्ती मानसिक तणावानेही त्रस्त असतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :
Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ