Brahma Muhurta: ज्योतिषशास्त्रात दिवसाच्या प्रत्येक प्रहराचे महत्त्व सांगितले आहे.  दिवसतील काही ठराविक वेळ अतिशय शुभ आणि महत्त्वपूर्ण असते. ब्रह्म मुहूर्त ही सर्वात शुभ वेळ मानली जाते. सूर्योदयापूर्वीचा जवळपास तास- दीड तासाची वेळ ब्रह्ममुहूर्त ( Brahma muhurta)  म्हणून मानली जाते.ब्रह्म मुहूर्त हा अतिशय पवित्र आणि शुभ काळ मानला जातो. अनेकांना प्रश्न पडतो ही दिवसाच्या इतक्या शुभ वेळी घरात झाडू मारला पाहिजे का?. ब्रह्म मुहूर्तावर साफसफाई करणे योग्य की अयोग्य?  (Brooming in Brahma muhurta Right or Wrong ) चला जाणून घेऊया. 


शुभ वेळ 


हिंदू धर्मात ब्रह्म मुहूर्ताला विशेष महत्त्व दिले जाते. ब्रह्म म्हणजे देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ. असे मानले जाते की ब्रह्म मुहूर्तावर सर्व देवी-देवता पृथ्वीवर येतात. अशा परिस्थितीत देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी या काळात काही विशेष काम करण्याचा सल्ला दिला जातो.   लागतो आणि सूर्यप्रकाशाची हलकी किरणे, तो काळ ब्रह्म मुहूर्ताचा असतो. यावेळी वातावरणातील ऊर्जा अतिशय शुद्ध, पवित्र आणि सकारात्मक असते.


झाडू मारु नका


बाह्म मुहूर्तावर झाडू मारणे शुभ मानले जात नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, ध्यान करणे आणि देवाचे स्मरण करणे यासारख्या महत्त्वपूर्ण कार्यांसाठी ही वेळ आहे. 


सकारात्मक उर्जेचा प्रवेश


यावेळी वातावरणातील सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. अशा वेळी झाडू  मारल्याने विपरीत परिणाम होतो. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत नाही .


झाडूचा वापर योग्य नाही


ब्रह्म मुहूर्ताच्या पवित्र वेळी झाडू मारणे शुभ मानले जात नाही. झाडू मारल्याने घरात नकारात्मक ऊर्जा नांदते.  


लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ


ब्रह्म मुहूर्त म्हणजे घरात  माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ. अशा परिस्थितीत, जर तुम्ही झाडू मारला तर माता लक्ष्मी आल्या पावली परत जाईल, झाडू मारणे फार महत्त्वाचे असेल तर घरातील कचरा बाहेर  जाणार नाही याची काळजी घ्या. ब्रह्म मुहूर्तानंतर कचरा बाहेर काढावा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :