Astro Tips : हिंदू धर्मात वेगवेगळ्या रिती आणि परंपरा पाळल्या जातात. त्याचप्रमाणे हिंदू धर्मग्रंथांत प्राण्यांचं देखील महत्त्व आहे. यामध्ये काही प्राणी दिसणं शुभ मानतात तर काही प्राणी दिसणं अशुभ मानतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण मुंगूस (Mongoose) या प्राण्याबद्दल जाणून घेणार आहोत.
खरंतर हिंदू धर्मात मुंगूस या प्राण्याला फार महत्त्वाचं स्थान आहे. हिंदू धर्मात मुंगूस हा फार शुभ प्राणी मानला जातो. मुंगूस दिसणं हे अत्यंत शुभ आहे असं आपण अनेकदा इतरांच्या तोंडी ऐकलेलं असेल. ज्योतिष शास्त्रानुसार, मुंगूसाला सूर्याचं प्रतीक म्हणून ओळखतात. मुंगूस व्यक्तीच्या जीवनामध्ये सूर्यासारखा तेजस्वी प्रकाश आणतो. तसेच, सकाळच्या वेळेस जर एखाद्या व्यक्तीला मुंगूस दिसला तर त्या व्यक्तीचा दिवस तर चांगला जातोच. पण त्याचबरोबर त्या व्यक्तीला धनलाभही होतो.
मुंगूस दिसणं म्हणजे साक्षात भगवान श्री विष्णूचं दर्शन करण्यासारखं आहे. तसेच, अनेकदा मुंगूसाचं संबंध आपल्या आर्थिक आणि भौतिक परिस्थितीशी जोडण्यात येतो.
तसेच, तुमच्या आजूबाजूच्या परिसरात जर मुंगूस दिसत असेल तर पुढच्या सात दिवसांत तुम्हाला पैशांशी संबंधित एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, तुम्ही रस्त्याने जात असताना मुंगूसाने तुमचा रस्ता ओलांडला तर तुमची सर्व कामे सुरळीत होतील असा सूचक इशाराही यामागे आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: