Astro Tips : खरंतर सोनं (Gold) म्हटल्यानंतर प्रत्येक महिलांचा, मुलींचा जिव्हाळ्याचा विषय असतो. आपल्याकडे जास्तीत जास्त दागिने असावेत अशी प्रत्येक महिलेची सुप्त इच्छा असते. पण, सध्या सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे सोनं खरेदी करणं प्रत्येक व्यक्तीला शक्य असतंच असं नाही. 


ज्योतिष शास्त्रानुसार, अशा काही राशी आहेत ज्यांनी सोनं परिधान करणं शुभ मानण्यात आलं आहे. तर, काही राशींनी सोनं परिधान करणं अशुभ मानलं जातं. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


सिंह रास (Leo Horoscope)


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सिंह राशीच्या लोकांसाठी सोनं फार शुभकारक आहे. सिंह ही अग्नि तत्त्वाची राशी आहे. आणि सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. असं म्हणतात की, सिंह राशीच्या लोकांना आपल्या करिअरमध्ये चांगलं यश मिळतं. सोन्याच्या शुभ प्रभावाने या राशीच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. तसेच, यांना धनाची कधीच कमतरता भासत नाही. 


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीच्या लोकांना सोनं परिधान करणं फार शुभ मानलं जातं. असं म्हणतात की, जे लोक सोनं परिधान करतात त्यांना आर्थिक चणचणीचा कमी सामना करावा लागतो. तसेच, जे लोक सोनं परिधान करतात त्या लोकांच्या जीवनात सर्व समस्यांपासून आराम मिळतो. 


कन्या रास (Virgo Horoscope)


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जर या राशीचे लोक सोनं परिधान करत असतील तर या राशींच्या जीवनात सुख-शांती आणि समृद्धी येते. असं म्हणतात की, सोनं परिधान केल्याने तुमच्या आयुष्यात आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत नाही. 


मकर रास (Capricorn Horoscope)


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सोन्याचं आभूषण परिधान करणं मकर राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक मानलं जातं. यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होते. तसेच, तुमच्या जीवनात आर्थिक स्थिरता येते. 


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीच्या लोकांनी सोनं परिधान करणं फार शुभ मानलं जातं. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जर मीन राशीचे लोक सोन्याचे दागिने परिधान करत असतील तर त्यांच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं. तसेच, तुमची आर्थिक स्थितीदेखील चांगली राहते. 


'या' राशींनी सोनं परिधान करु नये


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, काही राशींच्या लोकांसाठी सोनं परिधान करणं फार अशुभ मानलं जातं. ज्योतिषीय मान्यतेनुसार, वृषभ, वृश्चिक, मिथुन आणि कुंभ राशींच्या लोकांनी सोनं परिधान करु नये. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Vastu Tips : तुमची प्रत्येक इच्छा होणार पूर्ण, दूर होईल रोगराई, फक्त पंचमुखी हनुमानाचा फोटो 'या' दिशेला ठेवा; जाणून घ्या योग्य वेळ