Nokia Smartphone : गेल्या काही दिवसांत नोकिया (Nokia) कंपनीच्या संदर्भात आपण खूप काही ऐकून आहोत. काही कंपनीच्या बाबतीत तर काही कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात असे अनेक मुद्दे गेल्या काही दिवसांत चर्चेचा विषय ठरतायत. अशातच नोकिया कंपनीने भारतात नवीन प्रमुखाची नियुक्ती केली आहे. नोकियाच्या भारतातील नवीन मुख्य अधिकाऱ्यांचे नाव तरुण छाबरा असं आहे.


खरंतर, आत्तापर्यंत नोकियाचे स्मार्टफोन एचएमडी ग्लोबल कंपनी तयार करत होती. आणि हे स्मार्टफोन 'नोकिया' या ब्रँडच्या नावाने लॉन्च केले जात होते. मात्र,आता  एचएमडीने नोकियाच्या नावाने बनवलेले स्मार्टफोन लॉन्च करण्यास नकार दिला आहे. HMD Global ने अशी घोषणा केली आहे की, ते स्वतःचा स्मार्टफोन स्वतःच्या ब्रँडच्या नावाने लॉन्च करणार आहेत. 


नोकियाने भारतात आपल्या नवीन प्रमुखाची नियुक्ती केली  


या कारणास्तव, एचएमडीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाईटसह सर्व ठिकाणांहून नोकिया नावाचे ब्रँडिंग काढून टाकले आणि ते एचएमडीमध्ये बदलले. अशा परिस्थितीत नोकियाला स्मार्टफोन बाजारपेठ वाढवण्यासाठी आणि पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सुरुवातीपासूनच मेहनत घ्यावी लागणार आहे. कंपनीने या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली आहे.


या हालचालीचाच एक भाग म्हणून नोकिया कंपनीने तरूण छाब्रा यांची भारतातील मुख्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी तसेच खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंपनीने हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.मनी कंट्रोलने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, नोकियाचे भारतातील पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मलिक होते तर तरुण छाबरा हे नोकिया मोबाईल नेटवर्कचे भारतातील वरिष्ठ उपाध्यक्ष होते. 


हजारो लोकांचा रोजगार जाण्याची शक्यता 


संजय मलिक गेल्या आठ वर्षांपासून भारतात नोकियाचे प्रमुख होते. पण, आता त्यांची सेवा केवळ 31 मार्च 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. त्यांच्या जागी नोकिया इंडियाचे नवे प्रमुख तरुण छाबरा, नोकियाच्या मोबाईल नेटवर्क्सचे अध्यक्ष टॉमी उइटो यांना अहवाल देतील. नोकिया इंडियाने असं सांगितले आहे की, तरुण छाबरा एप्रिल 2024 पासून कंपनीचे भारत प्रमुख म्हणून काम करण्यास सुरुवात करतील.


नोकियाच्या ताज्या रिपोर्टनुसार, कंपनी आपल्या ब्रँडला जगात एक नवीन ओळख देण्यासाठी हजारो लोकांना नोकरीतून काढून टाकू शकते. कंपनी आपला खर्च कमी करण्यासाठी 2024 मध्ये जागतिक स्तरावर सुमारे 11,000 ते 14,000 कर्मचारी काढून टाकू शकते अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


Technology : मायक्रोसॉफ्ट तब्बल 20 लाख भारतीयांना देणार AI ट्रेनिंग; सीईओ सत्या नडेला यांची मोठी घोषणा