Astro Tips For Sleep: अनेकदा असं होतं की, वारंवार प्रयत्न करूनही आपल्याला झोप येत नाही. अशा वेळी चांगली झोप (Sleep) लागण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. कारण चांगली झोप लागली नाही तर आपला संपूर्ण दिवस खराब जातो. एवढच नाही तर चांगली झोप हे तुमचे नशीब बदलते. विश्वास बसत नाही ना, पण हे खर आहे जर तुम्ही झोपताना चांगला विचार केला तर तुमचे नशीब बदलेल. त्यामुळे झोपण्यापूर्वी फक्त खालील गोष्टींची काळजी घ्या त्यामुळे तुम्हाला आयुष्यात कधीच पैशांची कमतरता भासणार नाही.
पैसे मोजून झोपावे
10 रुपयांच्या नोटांचा बंडल रोज झोपताना मोजा. असे दरोरोज केल्यास हळू हळू तुमची आर्थिक स्थिती बदलेल
घरात कापूर जाळा
ज्योतिश शास्त्रानुसार घरात कापूर जाळल्याने सकारत्मक ऊर्जा निर्माण करते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी घरात धूप जाळा. धूप जाळल्याने नकारात्म ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख, शांती नांदचे
झोपताना कोणत्या दिशेला पाय करावे
झोपताना तुमचा पाय कोणत्या दिशेला येतो हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही झोपताना पायाच्या दिशेचा विचार केला नाही तर तुम्हाला शांत झोप लागणार नाही. रात्री झोपताना कधीही दरवाजाकडे पाय करुन झोपू नये
प्रार्थना करा
झोपताना आपल्या कुलदैवतांचे स्मरण करावे. यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तसेच आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील.
नकारत्मक गोष्टींचा विचार करू नका
झोपताना कधी नकारात्मक विचार करू नका. झोपताना आपण जो विचार करतो तेच पूर्ण होते. त्यामुळे कधीही नकाात्मक गोष्टींचा विचार करू नका
झोपताना कायम डावी कुशीवर झोपावे
रात्री झोपण्याअगोदर दोन तास जेवण करावे. तसेच रात्रीचे जेवण हलके असावे. रात्री झोपताना कायम डावी कुशीवर झोपावे
खरकटी भांडी ठेवू नका
रात्री झोपताना कधीही खरकटी भांडी स्वयंपकगृहात तशीच ठेवून झोपू नये, खरकट्या भांड्यांमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरात खरकटी भांडी ठेवल्यास घरात अलक्ष्मी वास करते. अलक्ष्मीला दारिद्र्य आणि कंगालीची देवी मानले जाते. जर खरकटी भांडी ठेवली तर घरात अलक्ष्मीचा वास करेल आणि तुम्ही कंगाल व्हाल.
हे ही वाचा :
Vasant Panchami 2024: मुलं अभ्यास करत नाही,वसंत पंचमीच्या दिवशी आई वडिलांनी मुलांसाठी करा हे उपाय; वर्गात कायम करतील टॉप
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)