Baba Vanga : येत्या काही दिवसांमध्ये 2022 संपून 2023 हे नवं वर्ष सुरू होईल. नव्या वर्षाची संपूर्ण जग उत्सुकतेने वाट पाहात आहे. परंतु नव्या वर्षासाठी वर्तवण्यात आलेली भविष्यवाणी खूपच भीतीदायक आहेत. भविष्यकार बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार,  2023 हे वर्ष अंधकारमय असेल. या वर्षात एलियन्स आणि आण्विक स्फोटांच्या संभाव्य भेटी आहेत. त्यामुळे पृथ्वीवरील लाखो लोकांचा मृत्यू होईल अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी वर्तवली आहे. 

Continues below advertisement

अमेरिकेतील 9/11, उत्तर कोरियासोबतचा तणाव, ब्रेक्झिट, बराक ओबामाचे अध्यक्षपद, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू इत्यादी गोष्टींबाबत अचूक भाकीत करणार्‍या बाबा वेंगा यांनी 2023 साठीही काही धक्कादायक भविष्यवाणी केली.  

Baba Vanga :  पृथ्वीवर एलियन्सचा हल्ला

बाबा वेंगा यांनी अनेक भाकिते केली आहेत. त्यातील अनेक भाकिते खरी ठरली आहेत. त्यांनी 2023 सालासाठी अशी भविष्यवाणी केली आहे की, जी मानवाला विचार करायला लावू शकते. पृथ्वीवरील एलियन्सचा हल्ला होण्याची भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी वर्तवली आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार, जग "स्वतःला अंधारात ढकलून देईल.  पुढच्या वर्षी एलियन पृथ्वीवर आले तर लाखो लोक अकाली मरतील अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केलीय.  

Continues below advertisement

Baba Vanga :  कोण आहेत बाबा वेंगा?

बाबा वेंगा यांचा जन्म 1911 मध्ये स्ट्रुमिका, उत्तर मॅसेडोनिया येथे झाला होता. असे मानले जाते की त्यांनी आपले बहुतेक आयुष्य बल्गेरियातील कोझुह पर्वताच्या रुपाइट प्रदेशात व्यतीत केले. 1996 मध्ये त्यांचे निधन झाले. पण मरण्याआधी त्यांनी 5079 सालापर्यंतची भविष्यवाणी वर्तवली आहे. एका अहवालात असेही म्हटले आहे की त्यांनी दावा केला होता की, त्यांना भविष्यात पाहण्यासाठी देवाकडून एक दुर्मिळ भेट मिळाली आहे. वयाच्या 12 व्या वर्षीच त्यांची दृष्टी गेली होती. 

Baba Vanga : भारतात सौर त्सुनामी येणार

दरम्यान, बाबा वेंगा यांनी भारताबाबत देखील भविष्यवाणी केलीय. बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये भारतात सौर त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे लोकांचे आणि पैशाचे मोठे नुकसान होणार आहे. याशिवाय आशिया खंडातील अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट होणार असून त्याचा परिणाम भारतावरही होणार आहे, असे बाबा वेंगा यांनी सांगितले आहे. 

महत्वाच्या बातम्या 

Baba Vanga : बाबा वेंगाची 2023 साठी भविष्यवाणी, वाचून अनेकांची झोप उडेल