Astro Auspicious time Sign: वेळ खूप ताकदवान गोष्ट आहे. प्रत्येकाची वेळ कधीच सारखी नसते. ही वेळच राजाला रंक आणि रंकाचा राजा देखील बनवू शकते. जेव्हा, आयुष्यात वेळ वाईट सुरु असते, तेव्हा सगळीकडे निराशा पसरलेली असते. पण, जेव्हा वेळ अनुकूल असते, तेव्हा सर्व समस्या चुटकीसरशी निघूनही जातात. वेळेनुसार माणूस बदलत असतो. कोणत्याही नात्यात आनंद, समृद्धी, प्रगती, यश, गोडवा आणण्याचे काम वेळ करत असते. मात्र, प्रत्येक वेळीच आपल्या आयुष्यात चांगली वेळ सुरु असेल, असे नाही.


कधी कधी वाईट वेळ सुरु असल्यावर अनेक अप्रिय अनुभव देखील येतात. असे म्हणतात की, वाईट किंवा चांगला काळ येण्यापूर्वी निसर्ग आपल्याला अनेक संकेत देतो. कधी हे संकेत आपल्या लक्षात येतात, तर कधी त्याकडे दुर्लक्ष होते. चला तर, जाणून घेऊया आयुष्यात येणाऱ्या सुखाची चाहूल देणाऱ्या काही महत्त्वाच्या संकेतांबद्दल...


‘हे’ आहेत सुखाची चाहूल देणारे संकेत!


* जर, घराच्या दारात येऊन गायब हंबरत असेल, तर ते घराच्या सुख समृद्धीत वाढ होण्याचे संकेत आहेत. यामुळे घरातील आनंदात आणखी वाढ होणार आहे. अशा गाईला दाराशी आपल्यावर भाकरी किंवा चपाती नक्की खाऊ घाला.


* चिमण्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत बसून किलबिलाट करत असतील, तर समजा लवकरच तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत.


* वाटेत कधी घोड्याची नाल सापडली तर, ती शुभ मानली जाते. मात्र, शनिवार सोडून इतर दिवशी वाटेत नाल सापडली तरच ती जवळ ठेवावी. शनिवारी नाल सापडणे अशुभ मानले जाते.


* कुठेही प्रवास करत असताना रस्त्याच्या उजव्या बाजूला साप किंवा माकड दिसले, तर ते धनप्राप्तीचे लक्षण आहे. तर, सकाळी उठल्या उठल्या पूजेच्या नारळाचे दशन होणे म्हणजे देवी लक्ष्मीची कृपा होणार असे मानले जाते.


* सुंदर फुलपाखरे देखील शुभ संकेतांचे प्रतीक आहेत. जर, तुम्हाला अचानक तुमच्या आजूबाजूला रंगीबेरंगी फुलपाखरे भिरभिरताना दिसली, तर समजा तुमच्या आयुष्यात लवकरच आनंदी आनंद येणार आहे.


* घरासमोर किंवा अंगणात आक अर्थात मंदार झाडाचे रोप उगवू लागले, तेव्हा समजून जा की, लवकरच तुमचे दिवस पालटणार आहेत आणि जीवनात आनंद येणार आहे. असे रोप दारात उगवणे देखील खूप शुभ मानले जाते.


* जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडत असाल आणि त्याचवेळी एखाद्या व्यक्तीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले, तर ते समृद्धीचे लक्षण मानले जाते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्त्वाच्या बातम्या :