Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात विठ्ठलमय वातावरण तसेच, भक्तीभावाचं वातावरण निर्माण झालं आहे. लवकरच आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) साजरी केली जाणार आहे. यंदा 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. हा दिवस सर्व 12 राशींसाठी (Zodiac Signs) नेमका कसा असेल? तसेच, 12 राशींना मिळणारे संभाव्य फायदे आणि कोणते उपाय करावेत हे ज्योतिषशास्त्र डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी सांगितलं आहे. जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
फायदा : करिअरमध्ये स्थैर्य, नवीन संधी.उपाय : विष्णु सहस्त्रनाम जप करा. लाल वस्त्र दान करा.
वृषभ रास (Taurus)
फायदा : आर्थिक स्थिती मजबूत होईल, गुंतवणूक लाभदायक.उपाय : पिवळे फळ (केळे) दान करा. विष्णूला तुपाचा दीप लावा.
मिथुन रास (Gemini)
फायदा : वैवाहिक जीवनात सुधारणा, नवे संबंध जुळतील.उपाय : हरिपाठ करा. पिवळे कपडे परिधान करा.
कर्क रास (Cancer)
फायदा : मानसिक शांतता, जुने संकट दूर होईल.उपाय : शंखध्वनी करा, झेंडूच्या फुलांनी विष्णु पूजन करा.
सिंह रास (Leo)
फायदा : मान-सन्मान, कार्यक्षेत्रात प्रगती.उपाय : मंदिरात गव्हाचे दान करा. विष्णु गायत्री मंत्र जपा.
कन्या रास (Virgo)
फायदा : आरोग्य सुधारेल, नोकरीत प्रमोशनची शक्यता.उपाय : हरिकथा ऐका किंवा भजनात भाग घ्या. दूधाचा दान करा.
तूळ रास (Libra)
फायदा : वैवाहिक जीवनात समाधान, सौंदर्यवर्धनात लाभ.उपाय : पांढऱ्या फुलांनी विष्णु पूजन करा. गरजू स्त्रियांना वस्त्र दान करा.
वृश्चिक रास (Scorpio)
फायदा : कर्जमुक्ती, न्यायालयीन प्रकरणात यश.उपाय : गायींना गूळ आणि हिरवा चारा द्या. हरिपाठ करा.
धनु रास (Sagittarius)
फायदा : विद्यार्थ्यांना यश, आध्यात्मिक उन्नती.उपाय : गुरु आणि वृद्ध व्यक्तींचे आशीर्वाद घ्या. विष्णु स्तोत्र पठण करा.
मकर रास (Capricorn)
फायदा : घरात आनंद, स्थावर मालमत्तेत लाभ.उपाय : विष्णुच्या चरणांवर तुळशीच्या पानांनी अर्घ्य द्या. काळ्या वस्त्रांचे दान करा.
कुंभ रास (Aquarius)
फायदा: प्रवासात यश, सामाजिक सन्मान.उपाय: गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकं दान करा. विष्णु यंत्राची स्थापना करा.
मीन रास (Pisces)
फायदा: आध्यात्मिक उन्नती, संत संगती लाभदायक.उपाय: संध्याकाळी तुळशी समोर दीप लावा. “ॐ नमो भगवते वासुदेवाय” चा जप करा.
ह्या एकादशीला जर तुम्ही श्रद्धेने उपवास, जप, दान आणि ध्यान केले, तर देव तुम्हाला पुढील चार महिन्यांसाठी खास प्रसन्न करतील.हरि ओम्!
डॉ. भूषण ज्योतिर्विद
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :