Astrology Panchang Yog 2 July 2025 : वैदिक शास्त्रानुसार, आज 2 जुलैचा दिवस आहे. आज चंद्राने कन्या राशीत प्रवेश केला आहे. तसेच, आजचा वार बुधवार असल्या कारणाने आज संपूर्ण दिवस बुध ग्रहाचा प्रभाव असणार आहे. आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी तसेच त्रिपुष्कर योगाचा (Yog) शुभ संयोग जुळून आला आहे. त्याचबरोबर, आज मालव्य राजयोग देखील निर्माण झाला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांना आज अप्रत्यक्षपणे लाभ मिळणार आहे. त्यामुळे आज तुमचा दिवस चांगला जाईल. तसेच, आजच्या दिवसात तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमेल. आज संकटं तुमच्या मार्गावर नसतील. त्यामुळे निश्चिंत राहा. गणराया तुमच्या पाठीशी आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे आज दूर होतील. तसेच, तुमचे हितचिंतक तुमच्या मागावर असतील. लवकरच यात्रेला जाण्याचा योग जुळून येणार आहे. तसेच, करिअरच्या एका टप्प्यावर वेगळं वळण लागणार आहे. जोडीदाराबरोबर चांगला संवाद साधाल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या कामकाजात चांगली प्रगती झालेली दिसेल. तसेच, सामाजिक क्षेत्रात तुमचा विकास होईल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. समाजात तुम्हाला मान-प्रतिष्ठा मिळेल. तसेच, नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. तसेच, आजच्या दिवशी काही प्रभावशाली लोकांशी तुमचा संपर्क वाढेल. नोकरदार वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस प्रमोशनचा असू शकता. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. पूजा करण्यात तुमचं जास्त मन रमेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस फार भाग्यशाली असणार आहे. आज तुम्हाला नोकरीत ट्रान्सफर मिळू शकते. तसेच, आज चांगल्या लोकांशी भेटीगाठी होतील. तुमचं कामात मन रमेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस फार अनुकूल असणार आहे. आज कोणताही निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घ्या. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन सुखी राहील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :     

Horoscope Today 2 July 2025 : आजच्या दिवशी 'या' 5 राशींवर प्रसन्न होणार गणराया; संकटांचा होणार विनाश, वाचा आजचे राशीभविष्य