कोल्हापूर : किल्ले विशाळगडवर झालेल्या हिंसाचारानंतर माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाळगड अतिक्रमण मुक्तीला लागलेल्या हिंसक वळणानंतर विशाळगडच्या पायथ्याला आणि विशाळगडावर प्रचंड प्रमाणात तोडफोड, वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याने पंचक्रोशीमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं आहे.
दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरू केली आहे. शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून पुण्याच्या रवींद्र पडवळ, कोल्हापूरचे बंडा साळोखे यांच्यासह 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 21 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, कालपासून संभाजी राजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पोलिसांनी आज हा संभाजीराजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विशाळगड आणि विशाळगडच्या पायथ्याशी दोन वेगवेगळी आंदोलन
पोलिसांकडून 500 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांच्य तपासामध्ये आणखी काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आणखी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, काल विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी पुण्याच्या रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वात आणि संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वात विशाळगड आणि विशाळगडच्या पायथ्याशी दोन वेगवेगळी आंदोलन झाली होती. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं आणि ज्यांचा गडावरील अतिक्रमणाशी काही सुद्धा संबंध नाही अशा लोकांच्या घरांवर हल्ले करण्यात आल्यानंतर प्रापंचिक साहित्याचे नुकसान करण्यात आल्याने संताप निर्माण झाला आहे. दरम्यान, पोलीस तपासामध्ये सीसीटीव्ही आणि इतर रेकॉर्डिंग पाहून गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या