Angarki Sankashti Chaturthi 2022 : गणेशोत्सवानंतर (Ganeshotsav) गणपती भक्तांना गणेशाची आराधना करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी (Angarki Sankashti Chaturthi) 13 सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी करण्याची परंपरा आहे. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळते. या दिवशी गणपतीला त्याच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्याने इच्छित फळ मिळते. यंदा अंगारकी संकष्टी चतुर्थी मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. या दिवशी बनवल्या जाणार्‍या शुभ योग आणि उपासना पद्धतीबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत.


अंगारकी संकष्टी चतुर्थी कधी आहे? (Angarki Sankashti Chaturthi) :


हिंदू कॅलेंडरनुसार, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10.37 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजे, बुधवार, 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10.23 वाजता समाप्त होईल. मात्र संकष्टी चतुर्थी 13 सप्टेंबरलाच साजरी होणार आहे.


अंगारकी संकष्टी चतुर्थीचा शुभ योग (Angarki Sankashti Chaturthi Muhurth) :


अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी 7.37 पर्यंत वृद्धी योग राहील आणि त्यानंतर अतिशय शुभ ध्रुव योग होईल. या दिवशी सकाळी 06:36 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06:05 पर्यंत सर्वार्थसिद्धी योग असेल. यादरम्यान अमृत योगही राहणार आहे.


अंगारकी संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत (Angarki Sankashti Chaturthi Puja Vidhi) :


या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे. या दिवशी चंद्रोदयापूर्वी गणेशाची पूजा करावी लागते. एका चौरंगावर लाल किंवा पिवळे कापड टाकून त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. गणेशाला अक्षता, धूप, दिवा, कापूर, लवंग आणि दुर्वा अर्पण करा. बाप्पाल चंदनाचं तिलक लावा. त्यानंतर त्यांना लाडू अर्पण करावेत. यानंतर गणपतीची आरती करून त्यांच्या मंत्रांचा जप करावा. तेव्हा तुमचे संकट दूर होण्यासाठी देवाला प्रार्थना करा.


महत्वाच्या बातम्या :