Angaraki Chaturthi 2023 : आज अंगारक संकष्टी चतुर्थी आहे. नववर्ष 2023 मधली पहिली अंगारकी चतुर्थी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांचा नाश करण्यासाठी, सुख-समृद्धी वाढवण्यासाठी, कौटुंबिक आणि वैवाहिक सुख प्राप्त करण्यासाठी संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते. अंगारक चतुर्थीच्या या दिवसापासून संकष्टी चतुर्थीचे व्रत सुरू होते. यावेळी चतुर्थी ही मंगळवार 10 जानेवारी 2023 रोजी आली म्हणून याला 'अंगारक चतुर्थी' म्हणतात. आज श्रीगणेशाची ठिकठिकाणी पूजा केली जाईल
गणेशाची आणि चंद्रदेवाची पूजा
आज 10 जानेवारी 2023, मंगळवार, पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची तृतीया दुपारी 12 वाजून 10 मिनिटांपर्यंत असेल. यानंतर चतुर्थी तिथी आज रात्री शेवटपर्यंत राहील. मंगळवारी आश्लेषा नक्षत्र सकाळी 9 वाजेपर्यंत राहील. यानंतर मघा नक्षत्र रात्रीच्या शेवटपर्यंत राहील. मंगळवारी आश्लेषा नक्षत्र प्रथम आणि नंतर मघा नक्षत्र असल्यामुळे या दिवशी कालदंड नावाचा योग तयार होईल. याशिवाय प्रीती आणि आयुष्मान नावाचे आणखी दोन योगही या दिवशी राहतील. राहुकाळ दुपारी 3 वाजून 14 मिनिटं ते 4 वाजून 34 मिनिटांपर्यंत असेल. या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी सायंकाळी गणेशाची आणि चंद्रदेवाची पूजा केली जाते. दिवसभर उपवास केला जातो. रात्री चंद्राची पूजा केल्याने उपवास सोडण्यात येतो. चतुर्थीची कथा दिवसातून एकदा गणेशाची पूजा करून ऐकली जाते.
दिवस - मंगळवार
नक्षत्र- आश्लेषा आणि मघा
सूर्योदय - सकाळी 7:14
सूर्यास्त - संध्याकाळी 5:54
चंद्रोदय - 10 जानेवारी रात्री 8:55
चंद्रास्त - 11 जानेवारी सकाळी 10:08
अभिजीत मुहूर्त- दुपारी 12:13 ते दुपारी 12:55
संकष्टी चतुर्थी व्रत का केले जाते?
संकट चतुर्थी व्रत समस्या नष्ट करण्यासाठी केले जाते. आयुष्यात मोठे संकट आले तर, कौटुंबिक, बाह्य, कामाशी संबंधित किंवा वैवाहिक जीवनाशी संबंधित असो, ते दूर करण्यासाठी संकट चतुर्थी व्रत पाळले जाते. कुटुंबातील एखादी व्यक्ती सतत आजारी असेल, खूप प्रयत्न करूनही आजार बरा होत नसेल, तर कुटुंबातील एखादा सदस्य रुग्णाच्या नावाने संकट चतुर्थी व्रत ठेवतो, यामुळे रुग्णाला लवकर फायदा होतो. संकट चतुर्थी व्रत आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आणि कर्जमुक्तीसाठी देखील जाते. काम नीट होत नसेल, नोकरीत प्रगती होत नसेल किंवा व्यवसायात सतत नुकसान होत असेल तर हे व्रत वर्षभर पाळावे. हे निश्चितपणे निराकरण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
संकष्टी चतुर्थी पूजा पद्धत
गणपतीवर श्रद्धा असलेले लोक या दिवशी उपवास करतात
-या दिवशी तुम्ही सूर्योदयापूर्वी पहाटे लवकर उठावे.
-व्रत पाळणाऱ्या लोकांनी प्रथम आंघोळ करून स्वच्छ व धुतलेले कपडे घालावेत. या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करणे खूप शुभ मानले जाते आणि असे केल्याने व्रत सफल होते असेही सांगितले जाते.
-स्नान झाल्यावर त्यांनी गणपतीची पूजा सुरू करावी. गणपतीची पूजा करताना व्यक्तीने आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवावे.
-सर्वप्रथम गणपतीच्या मूर्तीला फुलांनी सजवावे.
-तीळ, गूळ, लाडू, फुले, पाणी, धूप, चंदन, केळी किंवा नारळ प्रसाद म्हणून तांब्याच्या कलशात ठेवा.
-हे लक्षात ठेवा की तुम्ही पूजेच्या वेळी दुर्गा देवीची मूर्ती सोबत ठेवावी. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते.
-गणपतीला कुंकू, फुले आणि पाणी अर्पण करा.
-संकष्टीला गणपतीला तिळाचे लाडू आणि मोदक अर्पण करा.
- पूजेनंतर फळे, शेंगदाणे, खीर, दूध किंवा साबुदाणा याशिवाय काहीही खाऊ नये.
-संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी गणपतीची पूजा करा आणि संकष्टी व्रत कथा पठण करा.
-पूजा संपल्यानंतर प्रसाद वाटप करा. रात्री चंद्र पाहून उपवास मोडला जातो आणि त्यामुळे संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण होते.
-गणपतीसमोर धूप-दीप लावून खालील मंत्राचा जप करा.
गजाननं भूत गणादि सेवितं, कपित्थ जम्बू फल चारू भक्षणम्।
उमासुतं शोक विनाशकारकम्, नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम्।।
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)