Continues below advertisement

Angaraki Chaturthi 2026: हिंदू धर्मात अंगारकीचतुर्थीलामोठेमहत्त्वआहे. आणिआज2026 वर्षातलीपहिलीअंगारकीचतुर्थीआहे, पंचांगआणिज्योतिषशास्त्रानुसारहीचतुर्थीसर्वातप्रभावीमानलीजातेय. धार्मिकमान्यतेनुसार, मंगळवारीयेणाऱ्याचतुर्थीलाअंगारकीचतुर्थीअसेम्हटलेजाते. मंगळग्रहाशीसंबंधितत्यादिवशीकेलेलीश्रीगणेशाचीपूजासंकटनिवारण, कर्जमुक्ती, आरोग्यलाभत्याचबरोबरकार्यसिद्धीसहितकारकठरते. साधारणपणेसहामहिन्यातूनएकदाहीअंगारकीचतुर्थीयेते. आजच्यादिवसाचेमहत्त्व, चंद्रोदयवेळ, पूजेचाशुभमुहूर्तसर्वकाहीजाणूनघ्या...

अंगारकी चतुर्थी शुभ मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ (Angaraki Chaturthi 2026 Chandroday)

पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 6जानेवारी रोजी सकाळी 7:01 वाजता सुरू होईल आणि पुढील दिवशीम्हणजेच 7 जानेवारीच्या दिवशी सकाळी 6:52 वाजता संपेल. या दिवशी चंद्रोदयाचीवेळरात्री9:22वाजता असेल. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्राच्या पूजेचेही विशेष महत्त्व आहे. चंद्राची पूजा केल्यानंतरआणिअर्घ्यअर्पण केल्यानंतरच हा उपवास सोडतात. असे म्हटले जाते की चतुर्थीचा उपवास चंद्रदर्शन आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय अपूर्ण राहतो. म्हणूनच अंगारकी चतुर्थीचा उपवास चंद्रदर्शनानंतरच सोडला जातो.

Continues below advertisement

अंगारकी चतुर्थी हा मोक्षदायक दिवस...

धार्मिक मान्यतेनुसार,मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी संबोधले जाते आणि तिचे पावित्र्य फार मोठे आहे. मंगळदोषअसलेल्यांनी ह्या दिवशी केलेली श्री गणेशाची पूजा संकट निवारण, कर्जमुक्ती, आरोग्यलाभत्याचबरोबरकार्यसिद्धीस गुणकारी मनाली जाते. अंगारकी चतुर्थी हा मोक्षदायक दिवस मानला जातो म्हणूनच या दिवशी महागणपतीची उपासना केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेशासाठी उपवास केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद प्राप्त होतात.

2026 वर्षात कधी येणार अंगारकी चतुर्थी?

वैदिक दिनदर्शिकेनुसार, साधारणपणे सहा महिन्यातून एकदा चतुर्थी येते पण 2026 वर्षात ग्रह-नक्षत्रांच्या विशेष स्थितीमुळे तीन वेळा हा योग येत आहे. यावर्षी6जानेवारी, 5मे आणि 29 सप्टेंबर ह्या तीन दिवशी अंगारकी चतुर्थी येणार आहे.

अंगारकी चतुर्थीचे व्रतविधी काय आहे?

  • धार्मिक मान्यतेनुसार, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेश भक्त पहाटे लवकर स्नान करून श्री गणेशाची विशेष पूजा करतात.
  • गणरायाला त्याचा आवडता नैवेद्य मोदक अर्पण केला जातो.
  • गणेशाची मूर्ती किंवा चित्र फुलांनी सजवून आरती केली जाते.
  • अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत पूर्ण उपवास केला जातो.
  • चंद्रदर्शनानंतर उपवास सोडला जातो.
  • या दिवशी चंद्रदेवाचीही पूजा केली जाते.
  • चंदन, तांदूळ आणि फुले अर्पण केली जातात.
  • काही भक्त फळे, दूध किंवा साबुदाणा खिचडी घेऊन अंशतः उपवास करतात.
  • चंद्रोदयापूर्वी ‘गणपती अथर्वशीर्ष’ यासारखे वैदिक स्तोत्र पठण केले जाते.
  • काही ठिकाणी गणेश याग किंवा यज्ञ आयोजित केले जाते. 

हेही वाचा

Shubh Yog 2026: आज अंगारकी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योगसह जुळून आले अनेक शुभ संयोग, 3 राशींचं भाग्य फळफळलं, बाप्पाच्या कृपेने संकट दूर

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)