Angaraki Chaturthi 2025: वैदिक पंचागानुसार, सध्या श्रावण महिना सुरूय.  या महिन्याच अनेक सणांची मांदियाळी पाहायला मिळते. नुकताच रक्षाबंधनाचा सण झाला. आता गणेशभक्तांना आतुरता आहे ती म्हणजे अंगारकी चतुर्थीची.. वैदिक शास्त्रानुसार पाहायला गेलं तर, अंगारकी चतुर्थी ही अत्यंत खास मानली जाते, कारण ती वर्षातून फक्त एकदा येते, ही एक अत्यंत शुभ अशी मानली गेलेली संकष्टी चतुर्थी (Lord Ganesha) असते जी मंगळवारी येते. श्रीगणेशाची उपासना करणाऱ्यांसाठी अतिशय प्रभावी आणि फलदायी असते. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे. या संदर्भात डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. 

मंगळवारची अंगारकी चतुर्थी अत्यंत खास

वैदिक पंचांगानुसार, मंगळवारी येणारी ही चतुर्थी “अंगारकी” म्हणून ओळखली जाते. तसं पाहायला गेलं तर संकष्टी चतुर्थी ही दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा ती अंगारकी चतुर्थी म्हणतात. मंगळवारचा स्वामी ग्रह असलेल्या मंगळाला अंगारक असेही म्हणतात. म्हणूनच मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारक चतुर्थी असे म्हणतात. या व्रतामुळे कुटुंबात सुख-समृद्धी, रोगांपासून मुक्तता, मुलांचे सुख आणि सौभाग्य येते. या दिवशी गणपती आणि मंगळ ग्रहाची विशेष कृपा मिळते.

अंगारकी चतुर्थी नेमकी कधी आहे?

अंगारकी चतुर्थी : 12 ऑगस्ट 2025 (मंगळवार)

(ही तारीख पंचांगावर आधारित आहे; स्थानिक पंचांगात थोडे बदल असू शकतात.)

अंगारक चतुर्थीच्या भाग्यशाली राशी..

मेष (Aries Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, अंगारक चतुर्थीच्या दिवशी मंगळाचा स्वामी असल्याने तुमच्यासाठी हा दिवस खास असेल, तुमच्या उर्जेत प्रचंड वाढ होईल, जे काही संकट तुमच्यावर असेल, त्यापासून तुमची मुक्तता होईल. बाप्पा तुमचे रक्षण करेल.

सिंह (Leo Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, अंगारक चतुर्थीचा दिवस तुमचे मानसिक स्थैर्य संतुलित ठेवेल, प्रतिष्ठेत वाढ होईल, नोकरीत तुमच्या कामाचा चांगला प्रभाव दिसून येईल, धनलाभाचे संकेत देखील दिसत आहेत.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, अंगारक चतुर्थीचा दिवस वृश्चिक राशीसाठी अगदी उत्तम असेल, ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, कर्जमुक्तीचे योग दिसत आहेत. नोकरी-व्यवसायात उत्तम पैसे कमवाल, आर्थिक लाभाचे योग आहेत. 

मकर (Capricorn Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, अंगारक चतुर्थीचा दिवस  हा मकर राशीसाछी करिअर आणि व्यावसायिक यश मिळवून देणारा ठरेल, तुम्ही जे काही काम कराल त्यात तुमचे यश नक्की असेल. धनलाभाचे देखील योग आहेत. 

कुंभ (Aquarius Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, अंगारक चतुर्थीचा दिवस  कर्क राशीसाठी मनोकामना पूर्ण करणारा दिवस असेल, बाप्पा तुमची संकटातून सुटका करणार. जीवनात सुखाचे क्षण येतील.

अंगारकी चतुर्थी निमित्त पूजा अशा पद्धतीने करा..

  • गणपतीचे व्रत/उपवास ठेवा.
  • संकष्टी गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष 11, 21 किंवा 51 वेळा म्हणावे.
  • दूर्वा, शेंदूर, मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा.
  • मंगळ ग्रहासाठी “ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः” हा जप 108 वेळा करा.
  • रक्तवर्णी वस्त्र परिधान करा (मंगळाचे प्रतीक).
  • चंद्र दर्शनानंतर उपवास सोडावा.
  • गणपती मंदिरात लाडू किंवा मोदक दान करावे.

अंगारकी चतुर्थीचे फायदे माहितीय?

  • संकटांचे निवारण
  • आरोग्य सुधारते
  • ऋणमुक्ती
  • कोर्ट-कचेरीचे प्रश्न मिटतात
  • मानसिक त्रास दूर होतो
  • मंगळदोष कमी होतो
  • विवाहात अडथळे दूर होतात.

हेही वाचा :           

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी नशीब पालटणारे! जबरदस्त आदित्य योग बनतोय, श्रीमंत बनण्याची इच्छा पूर्ण होणार...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)