Angarak Yog In Kundali : वैदिक पंचांगानुसार, 23 एप्रिलला मंगळ (Mangal) ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला आहे, जिथे राहू ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत या दोन ग्रहांच्या युतीमुळे अशुभ अंगारक योग तयार झाला आहे. ज्योतिष शास्त्रात हा योग अत्यंत अशुभ मानला जातो, त्यामुळे या योगाचा सर्व राशींच्या व्यक्तीवर काही ना काही अशुभ परिणाम पडतो. पण अशा 3 राशी आहेत ज्यांच्या अडचणी यावेळी प्रचंड वाढू शकतात. तसेच या लोकांना आर्थिक नुकसान आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. नेमका कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) हा योग हानिकारक ठरणार? जाणून घेऊया 


वृषभ रास (Taurus)


अंगारक योग तुमच्यासाठी अशुभ सिद्ध होऊ शकतो, कारण तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि लाभाच्या स्थानावर हा योग तयार होत आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला कौटुंबिक बाबींमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबात काही बाबींवर एकमत होणार नाही. विवाहित लोकांना वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. तसेच, तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. त्यामुळे या काळात संयम बाळगावा. या काळात तुम्ही खूप विचारपूर्वक गुंतवणूक करावी.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी अंगारक योगाची निर्मिती वाईट ठरू शकते. यावेळी तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तसेच तुमची कोणतेही पोलीस केस किंवा कोर्ट केस चालू असल्यास त्यात तुमचा पराभव होऊ शकतो. या काळात इच्छाशक्ती कमी होऊ शकते, परंतु तरीही तुम्ही नवीन आव्हानांना नीट तोंड देऊ शकाल. या काळात तुम्हाला पाठदुखी आणि अल्सरसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला गुप्त शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी अंगारक योगाची निर्मिती हानिकारक ठरू शकते. या काळात छुपे रोग तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुम्हाला काही दुखापत होऊ शकते किंवा तुमचा अपघात होऊ शकतो. तसेच या काळात तुम्हाला अनावश्यक खर्च करावा लागू शकतो. तसेच जे हार्ट पेशंट आहेत त्यांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या काळात कोणतंही नवीन काम करणं टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकतं. यावेळी तुम्ही कोणालाही पैसे उधार देऊ नये.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Astrology : तब्बल 12 वर्षांनंतर सूर्य आणि गुरुची युती; 'या' राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, नवीन नोकरीसोबत व्यवसायात होणार प्रगती