Angarak Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रहाला (Mars) ग्रहांचा सेनापती मानण्यात आलं आहे. यासाठीच जेव्हा मंगळ ग्रहाची चाल बदलते तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर (Zodiac Signs) दिसून येतो. मंगळ ग्रह जवळपास 45 दिवसांनी राशी परिवर्तन करतात. सध्या मंगळ ग्रह वृश्चिक राशीत विराजमान आहे. तर, 7 डिसेंबरपर्यंत तो याच राशीत स्थित असणार आहे. त्यामुळे या काळात कोणत्या ना कोणत्या ग्रहावर मंगळ ग्रहाची दृष्टी पडते. अशातच मंगळ ग्रह राहू ग्रहाबरोबर संयोग करुन भयानक अंगारक योग निर्माण करणार आहे. याचा सर्व 12 राशींवर परिणाम होमार मात्र 3 राशींसाठी हा काळ फार संकटाचा ठरु शकतो. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रहाने 27 ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश केला होता. मकरत राशीत अकराव्या स्थानी राहून कुंभ राशीवर दृष्टी पडतेय. यामुळे मंगळ ग्रहाचा राहू ग्रहाबरोबर संयोग होऊन अंगारक योग निर्माण होणार आहे. हा योग क्रोध, आक्रमकता, उत्साह, वेगचा कारक ग्रह मानतात. मात्र इतर शुभ ग्रहाबरोबर युती होऊन याचा प्रभाव कमी होतो.
मकर रास (Capricorn Horoscope)
मंगळ ग्रहाने वृश्चिक राशीत प्रवेश करुन या राशीत अकराव्या स्थानी आपली जागा विराजमान केली आहे. अंगारक योगामुळे तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागेल. यासाठीच तुम्ही जो निर्णय घ्याल तो नीट विचारपूर्वक घ्या. तुमच्या वाणीत कठोरपणा वाढू शकतो. तसेच, कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करु नका. तुमचं काम बिघडू शकतं. मंगळ ग्रहाच्या या दृष्टीने गरोदर महिलांवर देखील परिणाम दिसून येईल. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्या.
कर्क रास (Cancer Horoscope)
या राशीच्या पाचव्या स्थानी मंगळ ग्रह विराजमान आहे. तर, अष्टम स्थानी राहू ग्रह विराजमान आहे. त्यामुळे काही राशींना या काळात विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. तुम्ही हाती जे काही कार्य घ्याल ते बिघडण्याची शक्यता आहे. तसेच, घरातील व्यक्तीच्या आरोग्याची परिस्थिती बिघडू शकते.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी अंगारक योग अनेक समस्यांनी भरलेला असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, भावा-बहिणीच्या नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घ्या आणि मगच निर्णय घ्या. जोडीदाराबरोबर देखील वादविवाद वाढू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :