Anant Ambani-Radhika Merchant Wedding Date : सध्या सगळीकडे मुकेश अंबानी (Mukesh Amabani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या छोट्या सुपुत्राची म्हणजेच अनंत अंबानी (Anant Ambani) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. संगीत, हळद असे रोज काहीना काही फंक्शन्स या सोहळ्यात पाहायला मिळतायत. अनेक दिग्गज सेलिब्रिटी तसेच राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत उद्या म्हणजेच 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
3 जुलै रोजी अनंत आणि राधिकाच्या लग्नाची पहिली रसम ज्याला 'मामेरू' असं म्हणतात हा कार्यक्रम पार पडला. खरंतर, त्यानंतरपासूनच चाहत्यांना तसेच नेटकऱ्यांना यांचा विवाहसोहळा नेमका कधी याबाबत उत्सुकता होती. त्यानुसार 12 जुलै रोजी हे दोघेही विवाह बंधनात अडकणार आहेत.
'या' दिवशी जुळून येणार शुभ योग...
ज्योतिषीय मान्यतेनुसार, 12 जुलैचा दिवस हा अत्यंत खास दिवस मानला जातोय. कारण या दिवशी सप्तमी तिथी, हस्त नक्षत्र आणि रवि योगासह अनेक शुभ संयोग जुळून येणार आहेत. हे योग नेमके का खास आहेत ते जाणून घेऊयात.
12 जुलै रोजी रवि योग पहाटे 05 वाजून 32 मिनिटांपासून ते संध्याकाळी 04 वाजून 09 मिनिटांपर्यंत असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, रवि योगाच्या दरम्यान आपण जी काही कार्य करतो त्यात आपल्याला चांगलं यश मिळतं. सुख-समृद्धी प्राप्त होते. त्याचबरोबर, या दिवशी अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 59 मिनिटांपासून सुरु होऊन दुपारी 12 वाजून 54 मिनिटांपर्यंत असणार आहे.
12 जुलैचा दिवस अत्यंत खास...
विवाहदिनी हस्त नक्षत्रचा संयोग देखील जुळून येणार आहे. हा योग संध्याकाळी 04 वाजून 09 मिनिटांनी सुरु होणार आहे. असं म्हणतात की, हस्त नक्षत्राचा संबंध यश आणि समृद्धीशी जोडला जातो. या व्यतिरिक्त 12 जुलै रोजी शुक्रवारचा दिवस आहे. हिंदू मान्यतेनुसार, शुक्रवारचा दिवस हा विवाहासाठी फार खास असतो. त्याचबरोबर, शुक्र ग्रहाला धन, वैभव, प्रेम, सौंदर्य आणि सुख-समृद्धीचा दाता म्हटलं जातं.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची विवाह तिथी...
लग्न तिथी - 12 जुलै 2024, शुक्रवार
आशीर्वाद तिथी - 13 जुलै 2024, शनिवार
रिसेप्शन - 14 जुलै 2024, रविवार
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :