Manoj Jarange Beed Shantata Rally: बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वात आज बीडमध्ये (Beed News) मराठा आरक्षण (Maratha Reservation) जनजागृती आणि शांतता रॅली पार पडणार आहे. आज मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या सभेनं मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचा (Maratha Reservation Awareness And Peace Rally) समारोप होणार आहे. रॅली बीड (Beed News) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे. तर, बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा होणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती आज बीडमध्ये मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली निघणार आहे. या रॅलीची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी 11 वाजता शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुख्यमार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप होणार आहे. त्यानंतर जरांगे पाटील यांचं भाषण होणार आहे.
जरांगे पाटील यांनी सगेसोयरे संदर्भात सरकारला दिलेला अल्टीमेटम 13 तारखेला संपणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये शांतता रॅली निघणार आहे. या रॅलीच्या अनुषंगानं मराठा समन्वयकांनी पार्किंग ॲम्बुलन्स, नाष्टा, पाणी याची व्यवस्था केली आहे. तसेच, स्वयंसेवकांची देखील नियुक्ती केली आहे. यात महिला स्वयंसेवकांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
शिवाजी महाराज चौकात जवळपास 10 फूट उंच स्टेज
आज बीडमध्ये मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं आहे. या रॅलीची तयारी पूर्ण झाली असून मराठा बांधवाकडून जय्यत अशी तयारी देखील करण्यात आली आहे. बीड शहरात मोठमोठे फ्लेक्स, बॅनर, भगवे झेंडे, यामुळे बीड शहरातील वातावरण भगवमय झालं आहे.
कसा असेल रॅलीचा मार्ग?
बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ही रॅली निघणार असून सुभाष रोड, माळीवेस चौक, अण्णाभाऊ साठे चौक, जालना रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भव्य अशी जाहीर सभा देखील होणार आहे. दरम्यान, या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी जवळपास 10 फूट उंच असं स्टेज देखील बनवण्यात आल आहे. दरम्यान ज्या ठिकाणी रॅलीचा समारोप होणार आहे आणि जिथे जाहीर सभा होणार आहे.
बीड मधील शांतता रॅलीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त
मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज बीडमध्ये शांतता रॅली आणि जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस दल सतर्क झालं असून अडीचशे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह एसआरपीएफ आणि आरसीपीच्या तीन प्लाटून नियुक्त करण्यात आल्या आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक पांडकर यांनी याबाबतचा आढावा घेत अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील शाळांना सुट्टी जाहीर
मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज बीडमध्ये शांतता रॅली आणि जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर बीड शहरात होणारी गर्दी लक्षात घेता बीड शहरातील सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचं पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलं असून सर्व प्राचार्य, मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत.