Akshaya Tritiya Wishes In Marathi : हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेचा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक. दरवर्षी वैशाख महिन्यातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. यंदा 10 मे रोजी अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2024) आली आहे, या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना हे खास मराठमोळे शुभेच्छा संदेश (Akshaya Tritiya Wishes In Marathi) पाठवू शकता आणि या दिवसाची गोडी आणखी वाढवू शकता.


अक्षय्य तृतीया शुभेच्छा संदेश (Akshaya Tritiya Wishes In Marathi)


अक्षय्य सुखाचा दिलासा
मनात कर्तृत्वाचा भरवसा
लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा
शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा..
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!


आशा आहे या मंगलदिनी
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद
सुख, समाधान घेऊन येवो..
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!


आनंदाचे तोरण लागो दारी
सुंदर रांगोळी अवतरे अंगणी
सुखासमाधानाचा असो आजचा
दिवस हीच सदिच्छा..
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!


सोन्याच्या झळाळीप्रमाणे
उजळून जावो आयुष्य तुमचे
सुख,समृद्धी नांदो तुमच्या दारी
हेच मागणे ईश्वराकडे आमचे..
अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!


या अक्षय तृतीयेला
तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद
जी इच्छा असेल ती होवो पूर्ण
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!


घन न घन जसा बरसतो ढग,
तशीच होवो धनाची वर्षा,
मंगलमय होवो हा सण
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक  शुभेच्छा!


अक्षय्य राहो सुख आपले
अक्षय्य राहो नाते आपले
अक्षय्य राहो प्रेम आपले 
आपणास व आपल्या परिवारास
अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!


अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो
येणारा प्रत्येक दिवस तुमचा सुख समाधानात जावो
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!


लक्ष्मीचा वास होवो
संकटाचा नाश होवो 
शांतीचा वास राहो
धनाची बरसात होवो
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!


साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया
या सणाच्या निमित्ताने सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच प्रार्थना
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!


आपल्या जीवनात नवचैतन्य येवो
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,
सुख, समाधान घेऊन येवो
अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!


प्रत्येक काम होवो पूर्ण..
न काही राहो अपूर्ण..
धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..
घरात होवो लक्ष्मीचं आगमन..
अक्षय्य तृतीयेच्या सोनेरी शुभेच्छा!


अक्षय्य राहो धनसंपदा,
अक्षय्य राहो शांती..
अक्षय्य राहो मनामनातील,
प्रेमळ निर्मळ नाती..
अक्षय्य तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा!


सोन्याचा रथ, चांदीची पालखी
ज्यात बसून घरी येवो लक्ष्मी देवी
तुमच्या कुटुंबाला 
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!


सण हा सोनेरी दिवसाचा
दिवस हा अक्षय तृतीयेचा
वाद न घातला आनंदाने साजरा करा
मिळेल फळ मग तुम्हालाही भराभरा
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!


हेही वाचा:


Akshaya Tritiya 2024 : तब्बल 100 वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला बनतोय गजकेसरी योग; 'या' 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, होणार अचानक धनलाभ