Akshaya Tritiya 2024 : हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षच्या तृतीया तिथीला अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya) सण साजरा केला जाणार आहे. त्यानुसार यावर्षीची अक्षय्य तृतीया 10 मे रोजी साजरी केली जाणार आहे. याच दिवशी परशुराम जयंती सुद्धा आहे. 


यावर्षीची अक्षय्य तृतीया फार खास मानली जाणार आहे. कारण या दिवशी शनी कुंभ राशीत शश राजयोग निर्माण करत आहेत. त्याचबरोबर, या दिवशी गजकेसरी योग आणि रवि योगसह अनेक शुभ योगदेखील निर्माण होणार आहेत. त्यामुळे या दिनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरंतर, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शनी तब्बल 100 वर्षांनंतर शश राजयोग निर्माण करत आहेत. त्यामुळे हा काळ फारच अद्भूत आणि खास असणार आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणत्या राशींवरचा साडेसाती दूर होईल या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शनीचा शश योग हा कुंभ राशीतच बनणार आहे. त्यामुळे कुंभ राशीवार साडेसातीचा प्रभावसुद्धा फार कमी असणार आहे. तुम्हाला जर नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर करू शकता. या दरम्यान तुम्हाला चांगली मोठी बातमी देखील मिळू शकते. 


मेष रास (Aries Horoscope)


अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शनीच्या कृपेमुळे मेष राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुम्हाला नोकरीत पगारवाढीबरोबरच मान-सन्मान देखील मिळेल. तसेच, नोकरदार वर्गाबरोबरच व्यापारी वर्गाला देखील याचा लाभ होणार आहे. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जुळून येणारा शश राजयोग वृषभ राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. तुमच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची पदोन्नती देखील होऊ शकते. या दरम्यान तुमच्या कुटुंबात देखील आनंदी वातावरण असेल. 


सिंह रास (Leo Horoscope)


अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांवर शनीची विशेष कृपा असणार आहे. या दरम्यान तुम्ही जितके कमी पैसे खर्च कराल तितकाच जास्त तुम्हाला लाभ मिळेल. करिअरमध्ये नवीन उंची गाठाल. तसेच, प्रगतीचे अनेक नवे मार्ग खुले होतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani Jayanti 2024 : यंदाची शनि जयंती कधी? या दिवशी चुकूनही 'या' चुका करू नका; शनि देईल कर्माचं फळ, एकामागोमाग येतील संकटं