Ahmedabad Plane Crash Vijay Rupani Numerology: 12/06 हा तोच आकडा आहे... जो अनेकांसाठी काळ घेऊन आला.. ही तीच तारीख आहे, ज्या दिवशी गुजरातमधील अहमदाबाद येथे दुर्दैवी विमान अपघात घडला... ज्यात विमानातील सर्वच 242 प्रवाशांवर काळाचा घाला आला... गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील याच विमानातून प्रवास करत होते.... या अपघातात त्यांचाही मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, विजय रुपाणी त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी लंडनला जात होते, पण मध्येच इतर प्रवाशांप्रमाणे त्यांनाही या विमान अपघातात प्राण गमवावे लागले, अशात दुःखाची गोष्ट म्हणजे विजय रुपाणी यांचा भाग्यशाली क्रमांक म्हणजेच त्यांचा लकी नंबरही त्यांचा जीव वाचवू शकला नाही अशी चर्चा जोरात सुरू आहे. विजय रुपाणींचा असा कोणता लकी क्रमांक होता? या क्रमांकाशी त्यांचे काय नाते होते? सर्वकाही जाणून घ्या..
विजय रुपानी यांचा लकी नंबरच अशुभ ठरला?
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या सर्व वाहनांचे क्रमांक 1206 होते. व्हायरल छायाचित्रांमध्ये असे दिसून येते की त्यांच्याकडे असलेल्या स्कूटीचा क्रमांक 1206 आहे आणि त्यांच्या सर्व गाड्यांचा क्रमांकही 1206 आहे. याशिवाय, आज ते ज्या सीटवर बसले होते त्याचा क्रमांकही 12 होता. इतकेच नाही तर रुपाणी यांचा बोर्डिंग वेळही दुपारी 12.10 वाजता होती, पण त्यांना हे माहित नव्हते की हा क्रमांक 12 त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरेल. कारण विजय रुपाणी 12/06 रोजी अपघाताचे बळी ठरले आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, विजय रुपाणी यांनी Z क्लासमध्ये बुकिंग केले होते, जो बिझनेस क्लास श्रेणीत येतो.
विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत रुपाणींचा समावेश
रिपोर्टनुसार, विजय रुपाणी हे विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुख्यमंत्र्यांच्या दुःखद यादीत सामील झाले आहेत.रुपाणी यांच्याव्यतिरिक्त, यादीत 2011 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेले अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू, 2009 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेले आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी (वायएसआर) आणि 1965 मध्ये विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री बलवंतराय मेहता यांचा समावेश आहे. विजय रुपाणी यांच्या पश्चात त्यांची पत्नी अंजली रुपाणी आणि दोन मुले - एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
हेही वाचा :
Air India Plane Crash In Ahmedabad: मोठा विमान अपघात होणार! 'तिने' आधीच भाकीत वर्तवलं होतं, महिला ज्योतिषाची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली, पोस्ट व्हायरल..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)