Astrology: 12 जूनचा तो दिवस, आणि अहमदाबाद येथील विमान अपघात... क्षणात होत्याचं नव्हतं झालं... विमानातील एकूण 242 प्रवाशांच्या मृत्यूची बातमी समजताच सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला..या अपघातानंतर विविध व्हिडीओ, फोटो सोशल मीडीयावर व्हायरल झाले. हा अपघात नेमका कसा झाला? नेमकं काय घडलं? याबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावरील या सर्व पोस्टमध्ये आणखी एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली, ती म्हणजे एका महिला ज्योतिषीची.. एक ट्विट, एक तारीख आणि एक अपघात... ही पोस्ट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या महिला ज्योतिषीने अवघ्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच 5 जून रोजी ट्विट केले होते, ज्यामध्ये त्यांनी विमान अपघात आणि विमान वाहतूक क्षेत्रात संभाव्य विनाशाचा इशारा दिला होता. आणि आता बरोबर सात दिवसांनी 12 जून रोजी, अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर, हे ट्विट व्हायरल होत आहे.
महिला ज्योतिषीची ती पोस्ट व्हायरल...
या महिला ज्योतिषीचे नाव शर्मिष्ठा असून @AstroSharmistha या x सोशल मीडियावर हॅंडलवरून तिने पोस्ट केली होती. या महिला ज्योतिषीने ट्विटमध्ये लिहिले आहे की 2025 मध्ये विमान वाहतूक क्षेत्रात भरभराट होईल, परंतु या काळात मोठे अपघात होण्याची शक्यता देखील असेल. त्यांनी असाही दावा केला की जेव्हा गुरु मृगशिरा आणि आर्द्रा नक्षत्रांमध्ये असेल, तेव्हा विमान वाहतूक क्षेत्रात विकास होईल, परंतु सुरक्षितता आणि स्थिरतेचा अभाव असेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये असेही लिहिले आहे की "विमान अपघाताच्या माझ्या भाकितावर मी अजूनही ठाम आहे".
एक भविष्यवाणी, आणि आता अपघात
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे ड्रीमलाइनर विमान उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड होऊन क्रॅश झाले. या विमानात 242 जण होते असे वृत्त आहे. आतापर्यंत 50 हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बहुतेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.
इतकं अचूक भाकित? नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस!
अहमदाबाद विमान अपघाताच्या या घटनेनंतर सोशल मीडियावर लोकांनी या ज्योतिषाचे जुने ट्विट शोधण्यास सुरुवात केली आणि ते काही वेळातच व्हायरल देखील झाले. सोशल मीडिया यूजर्स आता याला अचूक भाकित म्हणत आहेत. #ArtOfPrediction ट्रेंड करत आहे. काही जण म्हणत आहेत की इतकी अचूक भाकित? एकाने लिहिले, ग्रह-तारे खरोखरच आपल्या उड्डाणांचा मार्ग ठरवत आहेत का? महिला ज्योतिषीने तिच्या ट्विटमध्ये असेही लिहिले आहे की टाटा ग्रुप हैदराबादमध्ये राफेल जेटचे मॉडेल बनवेल, येत्या दोन वर्षांत इस्रो अंतराळ पर्यटन आणि उपग्रह तंत्रज्ञानात जगाला आश्चर्यचकित करेल. तिने सांगितले की तिने नक्षत्र संक्रमणाच्या आधारे या सर्व भविष्यवाण्या आधीच केल्या होत्या.
हेही वाचा :
Weekly Horoscope 16 To 22 June 2025 जूनचा तिसरा आठवडा 'या' 4 राशींसाठी भाग्याचा! कोणासाठी टेन्शनचा? करिअर, प्रेम, आर्थिक स्थिती कशी असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)