2025 Astrology: संपूर्ण जगभरात नववर्षाच्या आगमनाच्या जय्यत तयारीला सुरूवात झालीय. सर्वत्र मोठा जल्लोष पाहायला मिळतोय. सरत्या वर्षात सर्व अडचणी संपतील, आणि नव्या वर्षात नवी उमेद नवी आशा घेऊन आपण नववर्षाचे स्वागत करतो. जी महत्वाची कामं झाली नाहीत, आर्थिक अडचणी असतील तर त्या संपून येणारं वर्ष चांगलं जावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते, कारण वर्षाची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण वर्ष शुभ राहते असे मानले जाते. वर्षाच्या पहिल्या दिवसाचा ब्रह्म मुहूर्त खूप खास असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, हा असा क्षण आहे जेव्हा तुम्ही काही खास उपाय किंवा मंत्रांचा जप करून तुमच्या संपूर्ण वर्षासाठी शुभ आशीर्वाद मिळवू शकता...


2025 चा पहिला ब्रह्म मुहूर्त


ज्योतिषशास्त्रानुसार,1 जानेवारी 2025 रोजी ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतरही एकदा हे काम केले तर येत्या वर्षभरात तुमच्यावर अशा संपत्तीचा वर्षाव होईल, आणि चौपट प्रगती होईल. जाणून घेऊया वर्षाचा पहिला ब्रह्म मुहूर्त कधी आहे आणि यावेळी कोणते उपाय करावेत.हिंदू कॅलेंडरनुसार, 1 जानेवारी 2025 रोजी ब्रह्म मुहूर्ताची वेळ पहाटे 5:25 ते 6:19 पर्यंत असेल. या दरम्यान तुम्ही उठून आंघोळ करून हे उपाय करून पूजा करू शकता.


ब्रह्म मुहूर्तामध्ये हे उपाय करा


धार्मिक मान्यतांनुसार वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर कोणताही उपाय केल्यास वर्षातील 365 दिवस त्याचे शुभ फळ मिळतात. असे मानले जाते की या उपायामुळे धनाचा देव कुबेर प्रसन्न होऊन तुमच्यासाठी खजिन्याचे दरवाजे उघडतो. अशी मान्यता आहे. आता यातून तुम्ही किती बाहेर पडता हे तुमच्यावर अवलंबून आहे.


स्नान केल्यानंतर मंदिरात देशी तुपाचा दिवा लावताच या मंत्राचा जप करा - ॐ कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले: तू गोविंदा: प्रभाते कर दर्शनम्


या दिवशी किंवा वर्षभर या मंत्रांचा जितका जास्त जप कराल तितक्या वेगाने तुमच्या प्रगतीचे मार्ग खुले होतील.


असे मानले जाते की 33 कोटी देवी-देवता व्यक्तीच्या तळहातात वास करतात. सकाळी उठल्याबरोबर तळहाताकडे पाहून या मंत्राचा जप केल्यास तुमच्या घरातील तिजोरी संपत्तीने भरू लागते. 


ऊँ ब्रह्म मुरारी पुरान्तकारी भानु शशि भूमिस्तुतों बुधश्च गुरुश्च, शुक्र, शनिए, राहु, केतवा कुरुवंतु सर्वे मर्मे सुप्रभातम ऊँ 


हे मंत्र आजच आठवावेत. येत्या वर्षात तुम्ही या मंत्रांचा नियमित जप करण्यास सुरुवात केली, तर तुम्ही इतरांपेक्षा खूप वेगाने प्रगती करत आहात हे तुम्हाला सहज लक्षात येईल. आनंद तुमच्या घरात राहतो. घरात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला दिवसभर शांतता जाणवेल.


हेही वाचा>>>


Garud Puran: मृत्यूच्या वेळी व्यक्तीला 'असं' काय दिसतं? शेवटच्या क्षणी आवाज का बंद होतो? गरुड पुराणातून सत्य जाणून घ्या..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )