Garud Puran: मृत्यू म्हटलं की अनेकांना घाम फुटतो. अंगावर काटा उभा राहतो. लोकांना मृत्यूबद्दल खूप भीती वाटते. पण भगवान श्रीकृष्णांना भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे जो या पृथ्वीवर जन्म घेईल, त्याला मृत्यूही अटळ आहे. पण तुम्हाला माहितीय का मृत्यूच्या वेळी व्यक्तीला खूप वेदना होतात? मृत्यूच्या वेळी अनेक लोकांचा आवाज बंद होतो आणि माणूस रडायला लागतो. गीता, गरुड पुराण कथोपनिषद यांसारख्या आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये मृत्यूबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. व्यक्तीला शेवटच्या क्षणी असं काय दिसतं? गरुड पुराणातून सत्य जाणून घ्या...


मृत्यूच्या वेळी एखाद्या व्यक्तीला कसे वाटते?


एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीनुसार, ज्योतिषी पंकज पाठक यांनी सांगितले की, जीवन आणि मृत्यू एकमेकांना पूरक आहेत. गीतेतही श्रीकृष्णाने सांगितले आहे की, जो जन्म घेतो त्याचा अंत होणारच. मृत्यू अत्यंत क्लेशदायक मानला जातो. म्हणूनच लोक मृत्यूला घाबरतात, तर धार्मिक ग्रंथांमध्ये मृत्यू ही एक सामान्य प्रक्रिया असल्याचे वर्णन केले आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे मृत्यू ही शरीर बदलण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर वृद्ध होते तेव्हा आत्मा मृत्यूद्वारे त्याचे शरीर बदलतो. मृत्यूच्या वेळी एखाद्या व्यक्तीला कसे वाटते, व्यक्ती का रडते आणि त्याचा आवाज का थांबतो हे जाणून घ्या.


जेव्हा एखाद्या व्यक्तीचा शेवटचा क्षण जवळ येतो, तेव्हा..


गरुड पुराणानुसार, पापी व्यक्तीचा श्वास शरीराच्या खालच्या मार्गाने बाहेर पडतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा शेवटचा क्षण जवळ येतो, तेव्हा यमराजाचे दोन दूत त्याच्याकडे येतात. गरुड पुराणात असे सांगितले आहे की, यमदूत दिसायला खूप भितीदायक असतात आणि डोळे मोठे असतात. यमराजाच्या अशा दूतांना पाहून पापी प्राणी घाबरतात आणि लघवी करू लागतात. मृत्यूच्या वेळी यमराजाचे दूत त्या व्यक्तीकडे येतात आणि त्याचा जीव घेतात. त्यावेळी त्या व्यक्तीला 100 विंचूच्या नांगीएवढे वेदना जाणवते. यासोबतच त्या व्यक्तीचे तोंड आतून कोरडे पडू लागते आणि लाळ गळू लागते.


यमराजाचे दूत आत्म्याला यमलोकात घेऊन जातात.


गरुड पुराणानुसार, माणसाच्या मृत्यूच्या वेळी अंगठ्याच्या आकाराचा प्राणी ओरडत शरीरातून बाहेर पडतो. ज्याला यमराजाचे दूत पकडतात. यमराजाचे दूत त्या आत्म्याला पकडून यमलोकाच्या प्रवासाला घेऊन जातात. दूत त्याला बांधून सोबत घेऊन जातात. मृत्यूनंतर नरकाच्या प्रवासाला जाताना माणूस थकतो, तेव्हा यमराजाचे दूत त्याला घाबरवतात आणि त्या पापी प्राण्याला नरकातील दुःख सांगतात. यावेळी व्यक्ती आपल्या सर्व पापांची आठवण करून चालते. ज्याचा विचार करून त्याचे हृदय थरथर कापायला लागते.


व्यक्तीला सर्व काही आठवते


गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये दिव्य दृष्टी निर्माण होते. त्यावेळी त्या व्यक्तीला जग व्यापक दिसू लागते आणि त्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यातील घटना आठवतात. क्षणार्धात एखाद्याचे संपूर्ण आयुष्य डोळ्यांसमोर येते. यानंतर तो त्याच्या नव्या आयुष्याचा प्रवास सुरू करतो.


हेही वाचा>>>


आई-वडिलांच्या कर्माचे फळ मुलांना खरंच भोगावे लागते? काय म्हटलंय शास्त्रात? प्रेमानंद महाराजांनी दिलं आश्चर्यकारक उत्तर!


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )