20 October Birthday Numerology : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागचा (Virendra Sehwag) आज वाढदिवस आहे. 1978 मध्ये या दिवशी जन्मलेल्या सेहवागने क्रिकेटच्या खेळात आपल्या स्टाईलने अनेक विक्रम केले. अंकशास्त्रानुसार, 20 ऑक्टोबरला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो? येणारे नववर्ष त्यांच्यासाठी कसे असेल? जाणून घ्या
मूलांक क्रमांक कसा काढावा?
मूलांक संख्या ही एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज असते, म्हणजेच तुमचा जन्म ज्या तारखांना झाला त्या तारखांची बेरीज म्हणजे तुमचा मूलांक क्रमांक. जर तुमचा जन्म 1 ते 9 व्या दरम्यान झाला असेल तर तुमचा मूलांक क्रमांक हा असेल. जर तुमचा जन्म 10 ते 31 तारखेला झाला असेल तर या दोन संख्यांच्या बेरजेला तुमचा मूलांक क्रमांक म्हणतात. उदाहरणार्थ, जर तुमचा जन्म 22 तारखेला झाला असेल तर तुमची संख्या 4 असेल.
आयुष्यात ध्येय साध्य करण्यात यशस्वी होतात
20 ऑक्टोबरला जन्मलेले लोक त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आणि कार्यक्षमतेच्या जोरावर ते आयुष्यात ध्येय साध्य करण्यात यशस्वी होतात. सामान्य कुटुंबात जन्म घेऊनही हे लोक समाजात पूर्ण कीर्ती आणि सन्मान मिळवतात. घरगुती जीवन अनुकूल राहील. आयुष्याच्या उत्तरार्धात आर्थिक परिस्थिती मजबूत राहते.
कसा आहे स्वभाव?
20 रोजी जन्मलेल्या व्यक्तीचा मूलांक 2 असेल. तुम्ही अत्यंत भावूक आहात. तुम्ही स्वभावानेही संशयी आहात. दुस-यांच्या दु:खाने, वेदनांनी त्रस्त होणे ही तुमची कमजोरी आहे. 2 आणि 0 याची बेरीज संख्या दोन होते, अशा प्रकारे तुमची मूलांक संख्या दोन होईल. ही मूलांक संख्या चंद्र ग्रहाद्वारे नियंत्रित केली जाते. चंद्र हा मनाचा कारक आहे.
घाई करू नका
चंद्राप्रमाणे तुमच्या स्वभावातही चढ-उतार आहेत. जर तुम्ही घाई सोडली तर तुम्ही आयुष्यात खूप यशस्वी व्हाल. तुम्ही मानसिकदृष्ट्या निरोगी आहात पण शारीरिकदृष्ट्या तुम्ही कमजोर आहात. चंद्र ग्रह स्त्री ग्रह मानला जातो. त्यामुळे तुम्ही अतिशय सौम्य स्वभावाचे आहात. तुम्हाला अजिबात गर्व नाही.
शुभ तारखा: 2, 11, 20, 29
भाग्यवान क्रमांक: 2, 11, 20, 29, 56, 65, 92
शुभ वर्ष: 2027, 2029, 2036
इष्टदेव: भगवान शिव, भैरव
शुभ रंग: पांढरा, हलका निळा, चांदीचा राखाडी
2024 वर्ष कसे असेल?
आगामी 2024 वर्षात लेखनाशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. कोणत्याही कागदपत्रावर न पाहता सही करू नका. कोणत्याही नवीन कामाची योजना सुरू करण्यापूर्वी ज्येष्ठांचा सल्ला घ्या. व्यवसायाची स्थिती चांगली राहील. आरोग्याच्या दृष्टीकोनातून सावध राहण्याची वेळ येईल. कौटुंबिक वाद परस्पर समंजसपणानेच सोडवा. दुसऱ्यांमध्ये हस्तक्षेप करणे चांगले होणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांवर शनिची असते कृपा! सर्व कामे होतात पूर्ण, अंकशास्त्रात म्हटंलय...