MAHARASHTRA BOARD HSC RESULT 2023, Live, Maharshtra SSC Results 2023 Live

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharshtra SSC, HSC Result 2023) : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा या 2 ते 25 मार्च या काळात घेण्यात आली. तर बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत घेण्यात आल्या. या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनं घेण्यात आल्या होत्या. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बारावीचा तर जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होणार, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली होती. या निकालाची वाट विद्यार्थी उत्सुकतेने पाहत आहेत. एबीपी माझावर तुम्ही हा निकाल पाहू शकता.


MAHARASHTRA BOARD SSC/HSC RESULT 2023

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra Board) SSC/HSC निकाल 2022 (SSC/HSC Result 2022) : यंदाचे दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. बारावी बोर्डाचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाली असून निकालाची तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे

यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत आणि दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या काळात घेण्यात आली. मागील दोन वर्ष कोरोना लॉकडाउनमुळे दहावी बारावीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. मात्र यावर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. दहावीची परीक्षेसाठी 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी बसले होते. तर बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.