Turmeric Farming : अहमदनगर जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने हळद शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. प्रविण झरेकर असे त्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. उच्चशिक्षीत असलेल्या प्रविण झरेकरने नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय घेतला. त्याने आज तो निर्णय योग्य अससल्याचे सिद्ध करुन दाखवले आहे. दोन एकर क्षेत्रावर प्रविण झरेकर याने हळद शेतीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. त्यामाध्यमातून त्याने चांगला नफा मिळवला आहे.
 
प्रविण झरेकर यांचे बीएस्सी ऍग्रीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्यानंतर प्रविणनने नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय घेतला. हळद शेतीचा प्रयोग त्याने यशस्वी करुन दाखवला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील घोसपुरीच हे प्रविणचे गाव आहे. प्रविणने 2 एकरवर शेलम वाणाच्या हळदीची लागवड केली होती. ही शेती करण्यासाठी प्रविणला एकरी 50 हजार रुपयांचा खर्च आला होता. हळद पावडर बनवण्यासाठी एकरी 50 हजार रुपये खर्च येतो. खर्च वजा जाता प्रविणला एकरी 3 लाखांचा नफा मिळला आहे. हळद पावडर बनवण्यासाठी, वितरणासाठी घरच्यांची होते मदत होत असल्याचे प्रविणने सांगितले.  प्रविणने बनवलेल्या हळद पावडरला मुंबई, पुण्यात मागणी आहे.




दरम्यान, एबीपी माझाने प्रविण झरेकर याच्याशी संपर्क साधला. यावेळी त्याने सांगितले की, मला पहिल्यापासूनच शेतीची आवड होती. हळद शेतीकडे जाण्याचे कारण म्हणजे घरापुढे माझी आज्जी नेहमी थोडीफार हळद करत होती. जेवढी हळद घरी आवश्यक आहे तेवढी ती ठेवत होती. बाकीची राहिलेली हळद आज्जी पाहुण्यांना देत होती. त्यातूनच मला हळद शेती करण्याची प्रेरणा मिळाल्याचे प्रविणने सांगितले. आता 2 एकर हळद आहे. फक्त हळदीवर थांबलो नाही तर त्यापासून पावडर देखील तयार केली आहे. कोणत्याही प्रकारचे रासायनिक फवारणी केली नसल्याचे त्यांनी सांगितले. शेणखत मोठ्या प्रमाणावर हळदीला टाकल्याचे यावेळी प्रविणने सांगितले. हळदीची काढणी केल्यानंतर ती स्वच्छ करावी लागते. 15 ते 20 दिवस ती वाळवावी लागते असे झरेकर याने सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: