Washim News : साततत्यानं शेतकऱ्यांना (Farmers) कोणत्या ना कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येते. सध्या वाशिम (Washim) जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रब्बी पीक (Rabi Crop) धोक्यात आली आहेत. वारंवार विद्युत रोहित्र जळत असल्यामुळं वाशिम जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. रब्बी पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची महावितरणवर भिस्त आहे. 


शेतकऱ्यांवर पडतोय आर्थिक बोजा


सध्या वाशीमच्या  महावितरण कार्यालयात  शेतकऱ्यांची  लगबग दिसत आहे. विद्युत रोहित्र मिळवण्यासाठी    रब्बी हंगाम सुरु होताच सिंचनासाठी शेतकऱ्यांना वीज गरजेची आहे.  मात्र, ऐन रब्बी हंगामाच्या  सुरुवातीला  महावितरण कंपनीच्या ढिसाळपणामुळं निकृष्ट दर्जाचे रोहित्र पुरवले जात असल्यानं  शेतकऱ्यांचे  पेरणी केलेलं  रब्बी पिक धोक्यात आलं आहे.  नवीन रोहित्र  बसवताच काही वेळात रोहित्र जळून जात आहे. तर परत ने आन करण्यासाठी शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा  पडत आहे.


अधिकारी कार्यालयात भेटत नसल्याचा आरोप


शेतकऱ्यांना शेतात सिंचन करण्याऐवजी विद्युत कार्यालयात  रोहित्र मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र मिळावं यासाठी लोकप्रतिनिधी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना फोन करतात, त्यांना कार्यालयात जाऊन भेटण्याचा प्रयत्न करतात, मात्र अधिकारी फोन उचलत नाहीत. अधिकारी कार्यालयात भेटत नसल्याचा आरोप जिल्हा परिषदचे कृषी सभापती वैभव सरनाईक यांनी केला. तर नेते आणि लोकप्रतिनिधींच्या फोन कॉलनंतरही शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र मिळण्यासाठी कसरत करावी लागत आहे.




आधीच परतीच्या पावसाचा फटका, पुन्हा...


दरम्यान, आधीच परतीच्या पावसानं राज्यातील खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पीक वाया गेली आहेत. हाती आलेली पीक वाया गेल्यामुळं शेतकरी संकटात आहेत. अतिवृष्टीचा सर्वात जास्त तडाखा मराठवाडा आणि विदर्भाला बसला आहे. सोयाबीनसह कापूस, मका, फळबागांचे मोठे नुकसान या पावसामुळं झालं होतं. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. तसेच जनजीवन देखील विस्कळीत झालं होते. पिकांबरोबर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी देखील खरवडून गेल्या होत्या. शेतकऱ्यांच्या हातची सगळी पीक वाया गेल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. अशा स्थितीत शेतकऱ्यांची सगळी भिस्त आता रब्बी हंगामातील पिकावंर आहे. मात्र, रब्बी हंगामात विद्यूत रोहित्र जळत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या रोहित्र मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरण कार्यालयात दररोज चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळं आता शेती करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Cotton News : नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीला पोलिस, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडूनच कापसाची खरेदी करावी अन्यथा....