Washim Santra : विदर्भ म्हटल की, आपल्यासमोर येते ती नापिकी, कर्जबाजारीपणा, निसर्गाचा भरवसा नसणारी शेती आणि शेतकरी आत्महत्या. मात्र, सध्या विदर्भातील शेतकरी शेतमीमध्ये नव नवीन प्रयोग करत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची पिके घेत आहेत. त्यामाध्यमातून चांगले उत्पादन देखील काढत असल्याचे समोर आले आहे. वाशीमच्या एका शेतकरी पुत्राने नोकरीच्या मागे न लागता आपल्या शेतात संत्रा बाग फुलवली आहे. या संत्रा बागेतून त्या शेतकऱ्याला चांगला फायदा झाला आहे.


वाशीमच्या अडोळी गावातील विलास इढोळे यांच्याकडे वडिलोपार्जीत सात एकर शेती आहे. यापैकी तीन एकर शेतीमध्ये आठ वर्षापूर्वी संत्रा लागवड केली. पारंपारिक पद्धतीने संत्र्याचे ते उत्पन्न घ्यायचे. यातून त्यांना वार्षिक चार लाखापर्यंत उत्पन्न व्हायचे. मात्र, त्यांचा मुलगा वैभव इढोळे याने शेती करायला सुरूवात केल्यापासून त्यांचे चार लाखांचे उत्पन्न नऊ लाखांवर गेले आहे. 




वैभव हा विलास यांचा एकूलता एक मुलगा पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. गेल्या दोन वर्षापासून राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे शिक्षणासाठी किंवा रोजगासाठी गेलेल्या अनेकांना आपले गाव गाठावे लागले होते. यात विलास  इढोळे यांचा मुलगा वैभव इढोळे यालासुद्धा आपल्या गावी परत याव लागले. गावाकडे आलेल्या वैभवने आपल्या वडिलांना शेतीकामात मदत कसण्यास सुरुवात केली. आपल्या शिक्षणाचा उपयोग करत विकासने इंटरनेटवरून संत्रा पिकाबाबत शास्त्रशुद्ध माहिती गोळा करायला सुरुवात केली. अशातच त्याला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय वाशीम आणि पंजाबराव कृषी विज्ञान केंद्र करडा येथील अधिकारी, तंज्ञांचे मार्गदर्शन मिळत गेले. अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार त्याने संत्रा शेतीत प्रयोग केले. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याने चार लाखांचे उत्पन्न  नऊ लाखांवर नेले. यापुढे अधिक मेहनत करून संत्राचे उत्पन्न हे 15 ते 20 लाखापर्यंत नेणार असल्याचे वैभवने सांगितले.




दरम्यान, शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या शिक्षणाचा फायदा घेत नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीतून नोकरीपेक्षा मोठे उत्पन्न मिळते असा संदेश त्याने दिला आहे. वाशिम जिल्ह्याचे शेतकरी अधिक फळबागांकडे वळावा यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत आहे. फळबागंमध्ये वढ देकील झाली आहे. वाशिम जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र हे 4 हजार 200 हेक्टर   होते ते आता 8 हजार 300 हेक्टर वर पोहोचले आहे. त्यापैकी संत्रा शेतीचे क्षेत्र हे 6 हजार 200  हेक्टर आहे. तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करुन यशस्वी शेती करत आहेत. 


शेती बेभरवश्याची आहे. त्यातून जास्त उत्पन्न मिळत नाही. निसर्गाच्या भरवश्यावर पिकवण्यात येते असा समज आजच्या शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये आहे. त्यामुळे ते शेती न करता नोकरीच्या मागे लागतात. मात्र, वैभवने नोकरीच्या मागे न लागता शेतीतसुद्धा सोनं पिकवू शकतो, हे सिद्ध करुन दाखवले आहे.