Wardha News : वर्धा बोगस बियाणे प्रकरणी (Wardha bogus seed case) दिवसेंदिवस नव नवीन खुलासे होत आहेत. वर्ध्याच्या म्हसाळा इथं सापडलेल्या बोगस कपाशी बियाणे रॅकेटमधील आरोपीच्या घरी मोठी रोकड सापडली आहे. सेलू तालुक्याच्या रेहकी येथील आरोपी राजू जयस्वाल याच्या घरातून पोलिसांनी 28 लाख 20 हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. त्यामुळं आता या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता


रेहकी येथील आरोपी राजू जयस्वाल याच्या घरातून जप्त करण्यात आलेली 28 लाख रुपयांची रोकड ही बोगस बियाणे विक्रीतून आली असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये आणखी आरोपी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या 10 आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


15 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल 


वर्धा (Wardha) जिल्ह्यातील म्हसाळा इथं कोट्यवधी रुपयांच्या बोगस बियाणे (Bogus seed) निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पोलीस आणि कृषी विभागाने पर्दाफाश केला आहे. या बनावट बियाणे विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी तपास लावला आहे. याप्रकरणात सेवाग्राम पोलिसांनी 15 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन आठ आरोपींना अटक केली होती. याच प्रकरणात पुन्हा दोघांना अटक करण्यात आल्याने अटक आरोपीची संख्या दहावर पोहोचली आहे. 


एका पशुवैद्यकीय डॉक्टरलाही अटक


या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने वर्धा जिल्ह्याच्या हमदापुर येथून एका पशुवैद्यकीय डॉक्टरलाही अटक केली आहे. विजय अरुण बोरकर असं आरोपी डॉक्टरच नाव आहे. हा जनावरांचा डॉक्टर असून गावागावांत जनावरांवर उपचार करण्यासाठी जाताना बोगस बियाण्यांची पाकिटं घेऊन जात, त्याची शेतकऱ्यांना विक्री करत होता. पोलिसांनी अटक करताच या डॉक्टरने बियाणे विक्री केल्याची कबुली दिली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दहा आरोपींना अटक करत न्यायलयात हजर केले असता न्यायलयाने आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


पेरणीच्या हंगामात अनेकदा शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाणेच्या बाबतीत होणारी फसवणूक थांबवण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकराने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Wardha News : वर्ध्यातील बोगस बियाणे प्रकरणी 10 जणांना अटक, पशुवैद्यकीय डॉक्टरचाही समावेश, सात दिवसांची पोलीस कोठडी