Vegetable prices : गेल्या 15 दिवसापूर्वी पडलेला अवकाळी पाऊस आणि थंडीचा परिणाम होऊ लागल्यानं भाजीपाला उत्पादनात घट झालीय. उत्पादनात घट झाल्यानं गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक घटलीय. यामुळं भाज्यांच्या दरात 20 ते 30 रुपयांची वाढ (Vegetable prices) झालीय. पश्चिम महाराष्ट्र , उत्तर महाराष्ट्र मधून मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. मात्र, या भागात पडलेल्या आवकाळी पावसामुळं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच आता थंडी पडू लागल्यानं भाजीपाल्याच्या वाढीवर परिणाम होत आहे. दरम्यान, अशातच सर्वच भाजीपाला 90 ते 100 रुपयांवर गेला आहे.
राज्यातील वातावरणात सासत्यानं बदल होत आहे. कुठं थंडी तर कुठं ढगाळ वातावरण आहे. तर काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका काही शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळं भाजीपाला उत्पादनात मोठी घट झाली आहे. यामध्ये गवार आणि भेंडी 120 रुपये किलो झाली आहे. तसेच वांगे, दोडका आणि शेवगा भाजीने देखील शंभरी गाठली आहे. दुसरीकडे कांद्याने पन्नाशी गाठली आहे.
कोणत्या भाजीला किती दर? (प्रति किलो)
वांगी - 80
कोबी - 40
फ्लॅावर - 70
काकडी - 50
गवार - १२०
वटाणा -60 ते 70
ढोबळी मिरची - 90
टोमॅटो - 40 ते 45
कार्ली - 80
दुधी - 60
भेंडी - 120
गाजर - 50
कांदा - 45 ते 50
प्रति जुडी
पालक - 30
मेथी - 30
कोथींबीर - 30
परभणीसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला उत्पादित केला जातो. खरिपात कमी झालेले पर्जन्यमान त्यातच आता रब्बीतही अवकाळीमुळे सर्वत्र नुकसान झाल्याने भाजीपाला उत्पादन घटले आहे. त्यामुळे जिथं शेतकऱ्यांना वांगे, टोमॅटो, भेंडी, कांदे आदी भाजीपाल्याचे अपेक्षित उत्पादन होण्याऐवजी कमी झाले. ज्याचा परिणाम हा भावावर झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी आपला भाजीपाला उत्पादन करुन स्वतः विक्री करतात त्यांना काहीसा यातून फायदा होतो.
महत्त्वाच्या बातम्या: