Devendra Fadnavis : काही लोकांचा नखं कापून शहिद होण्याचा प्रयत्न असल्याचे वक्तव्य करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही गोष्टी बोलल्या जातात असेही फडणवीस म्हणाले. संजय राऊतांना पुराव्याच्या आधारे नोटीस मिळाली आहे, त्यांनी कायद्याने उत्तर द्यावे असेही फडणवीस म्हणाले. आमच्या अनेक नेत्यांच्या घरात माणसे घुसवत त्यांना नोटीसा देत आहेत. आम्ही कायद्याने त्यांचा मुकाबला करु असेही फडणवीस म्हणाले. संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर केलेले आरोप हास्यास्पद असल्याचे फडणवीस म्हणाले.


दरम्यान, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर देखील फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केलेले आरोप हास्यास्पद असल्याचे फडणवीस म्हणाले. ते कोणत्याच आरोपाचा पुराव देऊ शकले नाहीत. राज्य सरकारकडून सोमय्या आणि त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसंनी सांगितले की चुकीची कारवाई करता येणार नाही, असेही ते म्हणाले. काळजी करायचे कारण नाहीत कितीही दाबावाची कारवाई केली तरी सोमय्या बोलायचे बंद करणार नाहीत, असे फडणवीस म्हणाले.


शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीची कितवी टीम


मनसे ही भाजपची सी टीम असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्यांच्या या टिकेलाही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. माझा शिवसेनेला सवाल आहे की, शिवसेना  काँग्रेस, राष्ट्रवादीची कितवी टीम आहे. एक मुख्यमंत्रीपद घेऊन  तुम्ही पक्षाची काय अवस्था केली आहे. आपल ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याच बघायच वाकून हे जरा बंद करा असा टोलाही फडणवीसांनी सेनेला लगावला.


मराठी माणसाला लुटणारे कोण हे स्पष्ट


पत्रावाला चाळ गरिब मराठी माणसाचा प्रश्न होता. अनेक वर्ष हा प्रश्न भिजत पडला. ज्यांनी स्वत:ला गरिब माणसांचा मसिहा घोषीत केलं, त्यांनीच गरिबांचे इंटरेस्ट बिल्डरांच्या घशात घातले असा आरोपही फडणवीस यांनी केला. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचे आणि त्यांनाच लुटायचे हा धंदा मुंबईत कोण करत आहे हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ढोंगी लोक केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. आपल्या राज्य सरकारवर काही बोलत नाहीत, त्यांचे ढोंग खुले झाले असल्याचे म्हणत फडणवीसांनी काँग्रेसच्या आंदोलनावर टीका केली.