Top Agriculture Institutes: अलीकडच्या काळात कृषी क्षेत्रात (agricultural sector) सातत्यानं बदल होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच कृषी क्षेत्रात करिअरच्या संधी देखील वाढत आहेत. दरम्यान, नवीन तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रातील उत्तम संसाधनांमुळं हे क्षेत्र फायदेशीर ठरले आहे. आजच्या काळात लोक पारंपारिक शेती सोडून नवीन मार्गाने शेती करत आहेत, यातून त्यांना चांगला नफा मिळवत आहेत. सुशिक्षित शहरी तरुणांनाही देखील शेतीबद्दल आकर्षण वाढत आहे. दरम्यान, कृषी क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी देशातील कोणत्या संस्था महत्वाच्या आहेत याबाबतची माहिती आज आपण पाहणार आहोत. 


तुम्ही जर देशातील टॉप 10 कृषी संस्थांमधून कृषी क्षेत्राचा अभ्यास केला तर तुम्ही स्वतःचे काम करुन करोडो रुपये कमवू शकता. याशिवाय तुम्हाला कृषी शास्त्रज्ञ, मृदा तज्ञ अशा इतर पदांवरही नोकरी मिळू शकते. जाणून घेऊयात देशातील कृषी क्षेत्रातील टॉप-10 संस्था. 


कृषी क्षेत्रातील टॉप-10 संस्था


NIRF च्या 2023 च्या क्रमवारीनुसार, भारतीय कृषी संशोधन संस्था कृषी संस्थांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर ICAR म्हणजे राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेचा दुसरा क्रमाक लागतो. तर तिसऱ्या क्रमाकांवर पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना आहे. तर बनारस हिंदू विद्यापीठ चौथ्या क्रमाकावर असून आणि तामिळनाडू कृषी विद्यापीठ पाचव्या स्थानावर आहे. तर भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, इज्जतनगर सहाव्या क्रमांकावर आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, फिशरीज युनिव्हर्सिटी 7 व्या क्रमांकावर आहे. गोविंद बल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ पंतनगर विद्यापीठ आठव्या क्रमांकावर आहे. तर शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, काश्मीर, श्रीनगर 9 व्या क्रमांकावर आहे. तर चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठ, हिसार हे 10 व्या स्थानावर आहे.


या संस्थांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक संधी मिळतात


दरम्यान, या सर्व संस्था विद्यार्थ्यांना डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएशन, पीएचडी असे कोर्सेसद्वारे शिक्षण देतात. येथून शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक संधी मिळतात. या संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पॅकेजेस ऑफर केल्या जातात. तसेच विद्यार्थी स्वत:चा शेतीसारखा व्यवसाय करु शकतात. हे रँकिंग केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी जाहीर केले जाते. भारतातील सर्वोच्च विद्यापीठे आणि महाविद्यालयांची यादी या क्रमवारीत जाहीर करण्यात आली आहे. ही यादी विविध श्रेणी आणि विषयांच्या आधारे तयार करण्यात आली आहे.


महत्वाच्या बातम्या:


शेतकऱ्यांसाठी सरकारच्या योजना कोणत्या? किती मिळतो लाभ? सविस्तर माहिती एका क्लिकवर