Tomato Price : सध्या टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. बाजारपेठेत प्रतिकिलो टोमॅटोला 80 ते 100 रुपयांचा दर मिळत आहे. जीवनावश्यक वस्तू, खाद्यतेल यासोबचसोबत भाजीपाल्यांचे दर सुद्धा वाढले आहेत. सध्या टोमॅटो 80 ते 100 रुपये किलोने विकला जात असून, दरामध्ये पेट्रोल-डिझेल सोबत टोमॅटोची स्पर्धा आहे. टोमॅटोसह लसूण, शिमला मिरची व इतर भाज्यांचे दर सुद्धा वाढले आहेत. या वाढत्या दराचा राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मात्र चांगलाच फायदा होत आहे. वाढत्या दरामुळे टोमॅटो उत्पादकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.




टोमॅटोच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता


दरम्यान, बाजारपेठांमध्ये आवक घटल्यानं आणि नवा माल येत नसल्यानं हे दर वाढल्याचे बोलले जात आहे. येत्या महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात हे दर आणखी वाढतील असं भाजी विक्रेत्यांचं म्हणणे आहे. सध्या बाजारपेठेत टोमॅटोला चांगला दर मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरात टोमॅटोचे दर हे प्रतिकिलो 80 रुपयांवर पोहोचले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दक्षिणेकडील राज्यांचा विचार केला तर त्याठिकाणी एक किलो टोमॅटोसाठी शंभर रुपये मोजावे लागत आहेत. दर  ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर मान्सूनपूर्व पावसामुळं टोमॅटोची काढणी कमी झाली आहे. याचा परिणाम म्हणून टोमॅटोचे दर वाढले आहेत.




यंदा मार्चमध्ये टोमॅटोच्या लागवडी कमी


जास्त उष्णतेमुळं उत्तर प्रदेशातील टोमॅटो उत्पादक जिल्ह्यांमध्ये यंदा उत्पादन घटलं आहे. उत्पादन घटल्यामुळे बाजारपेठेत यंदा कमी टोमॅटोची आवक आहे. याचा परिणाम म्हणून टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी टोमॅटो आहेत, त्या शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होताना दिसत आहे. यंदा मार्चमध्ये टोमॅटोच्या लागवडी कमी झाल्या आहेत. त्यामुळे सध्या टोमॅटोच्या दरात वाढ होत आहे. जून, जुलै हे टोमॅटोसाठी चांगल्या भावाची शक्यता असलेले महिने असतात. मार्च 2022 मध्ये देखील टोमॅटोच्या कमी लागवडी झाल्या आहेत. त्यातच टुटा CMV ची दहशत होती. एप्रिलपर्यंत टोमॅटोच्या लागवडीचे प्रमाण खूप कमी राहिले. त्यामुळं दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या: